• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

कळंब पत्नीच्या खुनातील फरार आरोपी जेरबंद

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
November 3, 2026
in क्राईम
0
कळंब पत्नीच्या खुनातील फरार आरोपी जेरबंद
0
SHARES
368
VIEWS

कळंब पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! पत्नीच्या खुनातील फरार आरोपी जेरबंद; पोलीस निरीक्षक शकील शेख यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी कारवाई

कळंब | लोकविचार

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची चैन व दगडाने डोक्यात मारहाण करून हत्या केल्याच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला कळंब पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. आरोपी वारंवार आपले वास्तव्य बदलून पोलिसांना गुंगारा देत असताना कळंब पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे त्याचा शोध घेत पुनर्वसन सावरगाव शिवारातील शेतातील गोठ्यातून त्याला ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक शकील शेख यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान कळंब तालुक्यातील हासेगाव शिवारात सुमानधने पेट्रोल पंपासमोरील शेतात कोमल गणेश उर्फ विनायक शिवाजी टेकाळे, रा. पुनर्वसन सावरगाव, ता. कळंब यांची हत्या करण्यात आली होती. त्यांचे पती गणेश उर्फ विनायक शिवाजी टेकाळे यांनी चारित्र्यावर संशय घेऊन चैन व दगडाने डोक्यात मारहाण करून त्यांना जिवे ठार मारल्याची फिर्याद बंडू विश्वंभर पवार (वय ५१, रा. करंजकल्ला, ता. कळंब) यांनी दि. ८ ऑक्टोबर रोजी कळंब पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला; मात्र तो गावात मिळून येत नव्हता. वारंवार वास्तव्य बदलून तो पोलिसांना चकवा देत होता. अशा परिस्थितीत पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे शोधमोहीम तीव्र केली. अखेर आरोपी पुनर्वसन सावरगाव शिवारातील एका शेतातील गोठ्यात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाड टाकून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास कळंब पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शकील शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान बजबळकर तसेच पोलीस अंमलदार अनिल भोसले, किरण माळी, औदुंबर गजबार आणि सुनील तारळकर यांच्या पथकाने केली. 

फरार आरोपीचा सातत्याने पाठपुरावा करून त्याला जेरबंद करणाऱ्या कळंब पोलिसांनी आपल्या कार्यक्षमतेची पुन्हा एकदा चुणूक दाखवून दिली आहे. पोलीस निरीक्षक शकील शेख यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केलेली ही कामगिरी निश्चितच अभिनंदनीय असून, पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर गुन्ह्यांच्या तपासाला मिळणारी गती आणि नागरिकांच्या सुरक्षिततेप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित झाली आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashiv collectorLokvichar लोकविचारosmanabadआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

शरदचंद्र पवार यांचा धाराशिव नियोजित दुष्काळ पाहणी दौरा स्थगित

Next Post

Related Posts

स्थानिक गुन्हे शाखेचा गांजा तस्करांना दणका!
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेचा गांजा तस्करांना दणका!

November 10, 2026
दिवाळीच्या सुट्टीत बंद घराला चोरट्यांचा डाव;
क्राईम

दिवाळीच्या सुट्टीत बंद घराला चोरट्यांचा डाव;

November 8, 2026
सुकटा मारहाण प्रकरणातील मुख्य फरार आरोपी जेरबंद
क्राईम

सुकटा मारहाण प्रकरणातील मुख्य फरार आरोपी जेरबंद

October 21, 2026
धाराशिव LCB ची धडाकेबाज कारवाई
क्राईम

धाराशिव LCB ची धडाकेबाज कारवाई

October 19, 2026
परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
Next Post

ताज्या घडामोडी

आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मिळणार लाल दिवा!

आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मिळणार लाल दिवा!

November 21, 2026
तेरणा जलशुद्धीकरण केंद्राची pahani

तेरणा जलशुद्धीकरण केंद्राची pahani

November 20, 2026
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;

November 19, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!