• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

शरदचंद्र पवार यांचा धाराशिव नियोजित दुष्काळ पाहणी दौरा स्थगित

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
November 2, 2026
in महाराष्ट्र
0
शरदचंद्र पवार यांचा धाराशिव नियोजित दुष्काळ पाहणी दौरा स्थगित
0
SHARES
116
VIEWS

शरदचंद्र पवार यांचा धाराशिव नियोजित दुष्काळ पाहणी दौरा स्थगित; बारामती-पुण्यातील पावसाच्या परिस्थितीमुळे निर्णय

२ व ३ नोव्हेंबरचा दौरा रद्द; परंडा, बार्शी, कळंब आणि केजमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी होणारा संवाद तूर्तास पुढे ढकलला

धाराशिव लोकविचार 

मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ नेते तथा खासदार पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांचा २ व ३ नोव्हेंबर रोजी नियोजित असलेला दुष्काळ पाहणी दौरा स्थगित करण्यात आला आहे. बारामती तसेच पुणे जिल्ह्यात वाढत असलेल्या पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषद आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या  वतीने देण्यात आली आहे.

शरदचंद्र पवार यांच्या नियोजित दौऱ्यामुळे धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आपल्या व्यथा थेट मांडण्याची संधी मिळणार होती. मात्र, दौरा स्थगित झाल्याने शेतकऱ्यांशी होणारा संवाद आणि दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे.

२ नोव्हेंबर रोजी दौऱ्याच्या पहिल्या दिवशी शरदचंद्र पवार हे परंडा आणि बार्शी तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करणार होते. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरीप पिकांचे नुकसान, पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याची समस्या तसेच शेतीसमोरील आर्थिक संकटाची माहिती ते जाणून घेणार होते. त्यानंतर त्यांचा धाराशिव येथे मुक्काम नियोजित होता.

तर ३ नोव्हेंबर रोजी कळंब आणि केज तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागांना भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेण्याचे नियोजन होते. स्थानिक शेतकरी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर या दौऱ्यात भर देण्यात येणार होता.

यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे धाराशिव जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकरी गंभीर संकटात सापडले आहेत. खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि आगामी रब्बी हंगामाची तयारी यांसारखे प्रश्न गंभीर बनले आहेत. अशा परिस्थितीत खा.शरदचंद्र पवार यांच्या दौऱ्याकडे शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

दरम्यान, बारामती तसेच पुणे जिल्ह्यात वाढत असलेल्या पावसाची परिस्थिती लक्षात घेता आदरणीय पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांचा नियोजित दुष्काळ पाहणी दौरा स्थगित करण्यात आल्याचे आवाहन डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव आणि संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दुष्काळाच्या तीव्र संकटात सापडलेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या दौऱ्यातून दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. आता हा दौरा पुन्हा कधी आयोजित केला जाणार, याबाबत शेतकरी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectorLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

लोकविचार’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब!

Next Post

कळंब पत्नीच्या खुनातील फरार आरोपी जेरबंद

Related Posts

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;
महाराष्ट्र

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;

November 19, 2026
दिवाळीत लालपरीची विक्रमी ५४८ कोटींची कमा
महाराष्ट्र

दिवाळीत लालपरीची विक्रमी ५४८ कोटींची कमा

November 17, 2026
एस टी महामंडळ मध्ये मेगा भरती!
महाराष्ट्र

एस टी महामंडळ मध्ये मेगा भरती!

November 16, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र

दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न

November 16, 2026
तेरखेडा येथे स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभा करा
महाराष्ट्र

तेरखेडा येथे स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभा करा

November 16, 2026
अग्निशमन सेवा अद्ययावत करा – काँग्रेस
महाराष्ट्र

अग्निशमन सेवा अद्ययावत करा – काँग्रेस

November 16, 2026
Next Post
कळंब पत्नीच्या खुनातील फरार आरोपी जेरबंद

कळंब पत्नीच्या खुनातील फरार आरोपी जेरबंद

ताज्या घडामोडी

आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मिळणार लाल दिवा!

आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मिळणार लाल दिवा!

November 21, 2026
तेरणा जलशुद्धीकरण केंद्राची pahani

तेरणा जलशुद्धीकरण केंद्राची pahani

November 20, 2026
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;

November 19, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!