• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

जुना उपळा रोडवरील जीवघेणा खड्डा काँक्रीटने बुजवला

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 10, 2026
in राजकारण
0
जुना उपळा रोडवरील जीवघेणा खड्डा काँक्रीटने बुजवला
0
SHARES
279
VIEWS

नागरिकांच्या आवाहनाला भाजप नगरसेवकांचा तत्काळ प्रतिसाद जुना उपळा रोडवरील जीवघेणा खड्डा काँक्रीटने बुजवला

धाराशिव | लोकविचार

धाराशिव शहरातील जुना उपळा रोड परिसरातील ५ ते ६ फूट खोल खड्ड्याबाबत दोन दिवसांपूर्वी नागरिकांच्या संतप्त भावना आणि उपरोधिक होर्डिंगच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता. या वृत्ताची तसेच सोशल मीडियावर नागरिकांनी व्हायरल केलेल्या खड्ड्याच्या फोटोची दखल घेत धाराशिव नगरपरिषदेतील भाजपचे नगरसेवक राहुल काकडे व आकाश तावडे यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

महत्त्वाचे म्हणजे, संबंधित रस्ता नॅशनल हायवे असून तो आयआरबी कंपनीच्या अखत्यारित आहे. या रस्त्याचा नगरपरिषद प्रशासनाशी थेट संबंध नाही. मात्र आपण शहराचे लोकप्रतिनिधी आहोत आणि नागरिकांची गैरसोय तसेच अपघात टाळणे ही आपली जबाबदारी असल्याच्या भावनेतून नगरसेवक राहुल काकडे व आकाश तावडे यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घातले.

घटनास्थळी पाहणी केल्यानंतर दोन्ही नगरसेवकांनी संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधून खड्डा तातडीने बुजविण्याची विनंती केली. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन नगरसेवक काकडे आणि तावडे यांनी केलेली मागणी याचा संबंधित ठेकेदारानेही तत्काळ दखल घेतली आणि खड्डा काँक्रीटच्या माध्यमातून बुजविण्यात आला. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना होणारी गैरसोय दूर झाली असून, संभाव्य छोटे-मोठे अपघात टाळण्यास मदत झाली आहे.

नागरिकांच्या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद

दोन दिवसांपूर्वी या परिसरातील नागरिकांनी खड्ड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते. नागरिकांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत नगरसेवक राहुल काकडे व आकाश तावडे यांनी वेळ न दवडता प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि संबंधित यंत्रणेशी समन्वय साधत प्रश्न मार्गी लावला.

यावेळी “रस्ता कोणत्याही यंत्रणेच्या अखत्यारित असला तरी नागरिकांची सुरक्षितता आणि गैरसोय हा सर्वांचाच विषय आहे,” या भावनेतून आपण काम करत असल्याचे नगरसेवक राहुल काकडे यांनी स्पष्ट केले.

धाराशिवकरांच्या प्रत्येक नागरिकाच्या हक्कासाठी नगरपरिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सज्ज आहेत, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, खड्डा बुजविण्याची तातडीने कार्यवाही झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, नगरसेवक राहुल काकडे आणि आकाश तावडे यांनी नागरिकांच्या प्रश्नाची तत्काळ दखल घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारosmanabadआमदार कैलास पाटीलआमदार राणाजगजितसिंह पाटीलउस्मानाबादखासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनगराध्यक्ष नगर परिषद धाराशिवराजकारण
Previous Post

१५ ऑगस्टला १५१ फूट भगवा ध्वजाचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार लोकार्पण!

Next Post

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’च्या 155 कामांचा तपासणी अहवाल जनतेसमोर आणा – अमोल जाधव

Related Posts

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
अतिक्रमणे ७ सप्टेंबरपर्यंत हटवा
राजकारण

अतिक्रमणे ७ सप्टेंबरपर्यंत हटवा

September 4, 2026
Next Post
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’च्या 155 कामांचा तपासणी अहवाल जनतेसमोर आणा –  अमोल जाधव

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’च्या 155 कामांचा तपासणी अहवाल जनतेसमोर आणा - अमोल जाधव

ताज्या घडामोडी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!