• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

पाणी प्रश्नाचे कारण देत गावकऱ्यांची दिशाभूल करून मुंबई वारी? कला केंद्रांसाठी ‘लॉबिंग’ला वेग, परवान्यांसाठी पडद्यामागे हालचाली!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 5, 2026
in क्राईम
0
पाणी प्रश्नाचे कारण देत गावकऱ्यांची दिशाभूल करून मुंबई वारी? कला केंद्रांसाठी ‘लॉबिंग’ला वेग, परवान्यांसाठी पडद्यामागे हालचाली!
0
SHARES
446
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पाणी प्रश्नाचे कारण देत गावकऱ्यांची दिशाभूल करून मुंबई वारी? कला केंद्रांसाठी ‘लॉबिंग’ला वेग, परवान्यांसाठी पडद्यामागे हालचाली!

कला केंद्रांसाठी पुन्हा ‘लॉबिंग’ला वेग; मुंबई दौऱ्याच्या आड परवान्यांसाठी हालचाली, प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न?

धाराशिव Lokvichar – लोकविचार

धाराशिव जिल्ह्यातील वादग्रस्त कला केंद्रांवर प्रशासनाने कारवाई करून अनेक परवाने रद्द केल्यानंतर आता पुन्हा नवीन परवाने मिळविण्यासाठी तसेच रद्द झालेले परवाने पूर्ववत करण्यासाठी काही कला केंद्र चालक व संबंधितांची ‘लॉबी’ सक्रिय झाल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर काही गावपुढाऱ्यांच्या माध्यमातून राजकीय नेतृत्वाची भेट घेऊन प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.

माहितीनुसार, नुकतेच एका शिष्टमंडळाने मुंबई दौरा केला. गावकऱ्यांसमोर हा दौरा पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्नासाठी असल्याचे सांगण्यात आले. मात्र मंत्रालयात पोहोचल्यानंतर कला केंद्रांचा विषय प्रामुख्याने मांडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या काळात कला केंद्रांबाबत काही आश्वासने देण्यात आली होती. त्या आश्वासनांची आठवण करून देत संबंधितांनी राजकीय नेतृत्वाकडे साकडे घातल्याचे सांगितले जाते.

सूत्रांच्या माहितीनुसार, नेतृत्वाने शिष्टमंडळाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. त्यानंतर मंत्रालयातील विविध विभागांमध्ये त्यांना मार्गदर्शन (फोटोसेशन) करण्यात आले. मात्र याबाबत कोणताही ठोस निर्णय झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. काही संबंधितांनी न्यायालयाचाही दरवाजा ठोठावला असला तरी त्यांनाही अपेक्षित दिलासा मिळालेला नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे राजकीय माध्यमातून प्रशासनावर प्रभाव टाकण्याची रणनीती आखली जात असल्याचे बोलले जात आहे.

राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलिस अधीक्षक रितू खोखर, अपर जिल्हा दंडाधिकारी विद्याचरण कडवकर तसेच महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत जिल्ह्यातील अनेक कला केंद्रांची तपासणी केली होती. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर काही परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले, तर काहींचे नूतनीकरण नाकारण्यात आले. या कारवाईला अनेक लोकप्रतिनिधींनीही सामाजिक हिताचा मुद्दा म्हणून पाठिंबा दिला होता.

कला केंद्रांमुळे परिसरातील महिला, नागरिक आणि अनेक कुटुंबांना विविध प्रकारचा त्रास होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या. गुन्हेगारी, हाणामाऱ्या, अवैध धंदे आणि सामाजिक अस्वस्थता वाढत असल्याचेही अनेकदा समोर आले होते. प्रशासनाच्या कारवाईनंतर अशा घटनांमध्ये काही प्रमाणात घट झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

त्यामुळे गावकऱ्यांची दिशाभूल करीत गावातील पाणीपुरवठ्याचा विषय पुढे करून पुन्हा कला केंद्रांना परवानगी देण्याच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

धाराशिवमध्ये सहा कला केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले असले तरी त्याचवेळी नवीन सहा प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाल्याची माहिती आहे. देवी-देवतांच्या नावाने सुरू करण्यात येणाऱ्या काही कला केंद्रांमध्ये पूर्वी गंभीर गैरप्रकार घडल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. काही ठिकाणी हाणामाऱ्या, खून, लैंगिक शोषण तसेच वेश्याव्यवसायासारख्या गुन्ह्यांचाही तपासात उल्लेख झाला होता. यामुळे प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे सांगितले जाते.

तुळजाई, पिंजरा, कालिका, महाकाली, गौरी आणि साई या कला केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले होते. त्यापैकी बाबासाहेब घाटे यांच्या ‘पिंजरा’ आणि अक्षय साळुंके यांच्या ‘महाकाली’ कला केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, ‘नटरंग’, ‘चंद्राई’, ‘अंबिका’, ‘रेणुका’ तसेच इतर काही नव्या कला केंद्रांसाठी विविध व्यक्तींनी प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र अनेक प्रस्तावांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व इतर त्रुटी असल्याने प्रशासनाने अद्याप एकाही नवीन कला केंद्राला परवाना मंजूर केलेला नाही.

दरम्यान, काही ठिकाणी मोठ्या इमारती उभारून भविष्यात कला केंद्र सुरू करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा असून या व्यवसायात काही प्रभावशाली व्यक्तींची छुपी गुंतवणूक असल्याच्याही चर्चा रंगत आहेत. मात्र या दाव्यांबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. प्रशासनाची पुढील भूमिका आणि नवीन परवान्यांबाबतचा निर्णय याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलआमदार राणाजगजीतसिंह पाटील तुळजापूर भारतीय जनता पक्ष आई तुळजाभवानी बीजेपी भाजपाउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव लोकविचार
Previous Post

किराणा दुकान फोडणारे तीन सराईत आरोपी लाखोंच्या मुद्देमालासह जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Next Post

पालकमंत्री सरनाईकांची मोठी भेट! जिल्ह्याला मिळाल्या ३० ‘राजमाता जिजाऊ’ अत्याधुनिक बस खा. ओमराजेंच्या हस्ते लोकार्पण

Next Post
पालकमंत्री सरनाईकांची मोठी भेट! जिल्ह्याला मिळाल्या ३० ‘राजमाता जिजाऊ’ अत्याधुनिक बस खा. ओमराजेंच्या हस्ते लोकार्पण

पालकमंत्री सरनाईकांची मोठी भेट! जिल्ह्याला मिळाल्या ३० 'राजमाता जिजाऊ' अत्याधुनिक बस खा. ओमराजेंच्या हस्ते लोकार्पण

Recent Posts

  • येडशी–टेंभुर्णी चौपदरीकरणाला तीन महिन्यांत मंजुरी त्यानंतर तातडीने निविदा प्रक्रिया – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही
  • धक्कादायक! पत्नीने प्रियकराच्या मदतीने घडवून आणला नवऱ्याचा खून! ग्रामीण पोलिसांचा अवघ्या काही तासांत उलगडा
  • कळंबमध्ये अनैतिक देहव्यवसायावर पोलिसांचा छापा प्रभात लॉजमधून दोन महिलांची सुटका, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आवाहनाला प्रतिसाद धाराशिव बसस्थानकात विभाग नियंत्रक पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण
  • एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ; “झाडे लावा, झाडे जगवा”चा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा संदेश

Recent Comments

  1. Austen Web on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Randy WebDev on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Chief Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Chris Webber on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Allen Bell on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.