• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

किराणा दुकान फोडणारे तीन सराईत आरोपी लाखोंच्या मुद्देमालासह जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 4, 2026
in क्राईम
0
किराणा दुकान फोडणारे तीन सराईत आरोपी लाखोंच्या मुद्देमालासह जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
0
SHARES
61
VIEWS

किराणा दुकान फोडणारे तीन सराईत आरोपी लाखोंच्या मुद्देमालासह जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

धाराशिव लोकविचार 

रूई (ढोकी) येथील किराणा दुकान फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या तीन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करत दोन घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. आरोपींकडून चोरीतील मुद्देमालासह गुन्ह्यात वापरण्यात आलेली इनोव्हा कार असा एकूण ६ लाख ५९ हजार ६१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ३ जुलै रोजी मालमत्तेविषयक गुन्ह्यांचा तपास करत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार कन्हेरवाडी पाटी येथील सुभाष भीमराव काळे यांनी काही दिवसांपूर्वी किराणा दुकानातून चोरी केलेले तेलाचे डबे व इतर साहित्य शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवले असल्याची माहिती मिळाली. तसेच आरोपी पुन्हा इनोव्हा कार घेऊन त्या ठिकाणी येणार असल्याचेही समजले.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सुभाष भीमराव काळे (वय ३४, रा. कन्हेरवाडी पाटी), अनिल रमेश शिंदे (वय २९, रा. मुरुमसा) आणि अरुण बबन शिंदे (वय २८, रा. माहा) यांना ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली.

आरोपींच्या सांगण्यावरून पोलिसांनी शेतातील पत्र्याच्या शेडमधून किर्ती गोल्ड व इतर कंपन्यांचे तेलाचे १३ डबे, निळ्या व लाल रंगाच्या ८ पिशव्यांमध्ये असलेले घडी डिटर्जंट व स्मार्ट निर्मा पावडर तसेच गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार जप्त केली. या कारवाईत एकूण ६,५९,६१५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली सपोनि सचिन खटके, सपोनि स्वप्नील वाळके, पोहेकॉ विनोद जानराव, नितीन जाधवर, अमोल निंबाळकर, बबन जाधवर, मनोज जगताप, मपोहेकॉ शोभा बांगर, चापो, महेबूब अरब, रोहित दंडनाईक आदींच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती

Next Post

पाणी प्रश्नाचे कारण देत गावकऱ्यांची दिशाभूल करून मुंबई वारी? कला केंद्रांसाठी ‘लॉबिंग’ला वेग, परवान्यांसाठी पडद्यामागे हालचाली!

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post
पाणी प्रश्नाचे कारण देत गावकऱ्यांची दिशाभूल करून मुंबई वारी? कला केंद्रांसाठी ‘लॉबिंग’ला वेग, परवान्यांसाठी पडद्यामागे हालचाली!

पाणी प्रश्नाचे कारण देत गावकऱ्यांची दिशाभूल करून मुंबई वारी? कला केंद्रांसाठी 'लॉबिंग'ला वेग, परवान्यांसाठी पडद्यामागे हालचाली!

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!