• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

पालकमंत्री सरनाईकांची मोठी भेट! जिल्ह्याला मिळाल्या ३० ‘राजमाता जिजाऊ’ अत्याधुनिक बस खा. ओमराजेंच्या हस्ते लोकार्पण

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 5, 2026
in महाराष्ट्र
0
पालकमंत्री सरनाईकांची मोठी भेट! जिल्ह्याला मिळाल्या ३० ‘राजमाता जिजाऊ’ अत्याधुनिक बस खा. ओमराजेंच्या हस्ते लोकार्पण
0
SHARES
73
VIEWS

पालकमंत्री सरनाईकांची मोठी भेट! जिल्ह्याला मिळाल्या ३० ‘राजमाता जिजाऊ’ अत्याधुनिक बस खा. ओमराजेंच्या हस्ते लोकार्पण

धाराशिव Lokvichar – लोकविचार

राज्य परिवहन महामंडळाच्या धाराशिव विभागाच्या ताफ्यात आज तब्बल ३० नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसांची भर पडली. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते या बसचे लोकार्पण करण्यात आले. आधुनिक सुविधा, आरामदायी आसन व्यवस्था आणि वाढीव प्रवासी क्षमतेमुळे जिल्ह्यातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि दर्जेदार प्रवासाचा लाभ मिळणार आहे.

लोकार्पण समारंभाच्या प्रारंभी विभाग नियंत्रक अजय पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन खासदार ओमराजे निंबाळकर यांचे स्वागत केले. यावेळी एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नव्या बसमध्ये ३ बाय २ आसन व्यवस्था असून प्रत्येकी ५६ प्रवाशांची क्षमता आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांसह विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्गासाठी या बस मोठा दिलासा ठरणार आहेत.

यावेळी बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी, “जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत आणि दुर्गम खेड्यांपर्यंत एसटी सेवा वेळेत आणि नियमित पोहोचली पाहिजे. बसची कमतरता भासल्यास राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा करून आणखी बसेस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू,” अशी ग्वाही दिली.

धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला विशेष प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येत आहे. नवीन बस उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागातील सेवा मजबूत करणे आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्यावर त्यांनी भर दिल्याने धाराशिव विभागाच्या परिवहन सेवेत सातत्याने सुधारणा होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एसटी सेवा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने ही बस भर मोठे पाऊल मानली जात आहे.

या कार्यक्रमास विभाग नियंत्रक अजय पाटील, यंत्र अभियंता रविराज घोगरे, आगार प्रमुख प्रवीण भोंडवे, विभागीय वाहतूक अधिकारी मथुरा जाधवर, संतोष कोष्टी, स्थानक प्रमुख मुकेश कोमटवार, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक बालाजी बारते, वाहतूक नियंत्रक याहिया काझी, सुरज पायाळ यांच्यासह महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तसेच शिवसेनेचे रवि कोरे आळणीकर, गजानन नलावडे, माजी नगरसेवक सोमनाथ गुरव, संजय उर्फ पप्पू मुंडे, अमित उंबरे, आदित्य पाटील, काका शिनगारे, गणेश जमाले, शिवयोगी चपने, भिमा अण्णा जाधव, प्रशांत साळुंखे, तात्या पडवळ, दादा घोडके यांच्यासह अनेक प्रवासी व नागरिकांनी या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती लावली.
नवीन बसच्या समावेशामुळे धाराशिव जिल्ह्यातील एसटी वाहतूक अधिक सक्षम होणार असून ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsosmanabadआमदार अमित देशमुखआमदार कैलास पाटीलआमदार तानाजीराव सावंतआमदार प्रवीण स्वामीआमदार राणाजगजितसिंह पाटीलउस्मानाबादखासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपरिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक
Previous Post

पाणी प्रश्नाचे कारण देत गावकऱ्यांची दिशाभूल करून मुंबई वारी? कला केंद्रांसाठी ‘लॉबिंग’ला वेग, परवान्यांसाठी पडद्यामागे हालचाली!

Next Post

भाजपा नेते “नितीन (बप्पा) शेरखाने पुन्हा खा.ओमराजेंच्या संपर्कात! जिल्ह्यात नव्या समीकरणांची चर्चा!

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post
भाजपा नेते “नितीन (बप्पा) शेरखाने पुन्हा खा.ओमराजेंच्या संपर्कात! जिल्ह्यात नव्या समीकरणांची चर्चा!

भाजपा नेते "नितीन (बप्पा) शेरखाने पुन्हा खा.ओमराजेंच्या संपर्कात! जिल्ह्यात नव्या समीकरणांची चर्चा!

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!