• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

‘नीट’ व ‘टीईटी’ पेपरफुटीवरून धाराशिव काँग्रेस आक्रमकजिल्हाभर तीव्र आंदोलने छेडणार

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 30, 2026
in राजकारण
0
‘नीट’ व ‘टीईटी’ पेपरफुटीवरून धाराशिव काँग्रेस आक्रमकजिल्हाभर तीव्र आंदोलने छेडणार
0
SHARES
2
VIEWS

‘नीट’ व ‘टीईटी’ पेपरफुटीवरून धाराशिव काँग्रेस आक्रमक
जिल्हाभर तीव्र आंदोलने छेडणार

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
‘नीट’ (NEET) आणि ‘टीईटी’ (TET) पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. मात्र केंद्र व राज्य सरकारला विद्यार्थ्यांच्या भविष्याची कोणतीही चिंता नसून त्यांना केवळ फोडाफोडीचे व सत्तेचे राजकारण करण्यातच रस आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे धाराशिव जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी केली.
धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राजेनिंबाळकर म्हणाले की, ‘नीट’ आणि ‘टीईटी’ पेपरफुटी ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी झालेली गंभीर फसवणूक असून या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही त्यांनी मागणी केली.
सरकार बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई आणि शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून शिक्षकांची संख्या कमी केली जात आहे, तर दुसरीकडे टीईटी परीक्षेसाठी जाचक अटी लागू करून अन्याय केला जात आहे. त्यामुळे टीईटी परीक्षेतील जाचक अटी तातडीने रद्द कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
सरकारच्या शिक्षणविरोधी धोरणांविरोधात काँग्रेस पक्ष आता संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात तीव्र आंदोलने, मोर्चे आणि निषेध कार्यक्रम राबविणार असल्याची घोषणा राजेनिंबाळकर यांनी केली. या आंदोलनाची सांगता 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी नवी दिल्ली येथे काँग्रेसचे नेते तथा देशाचे विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.
यावेळी काँग्रेसचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष उमेश राजे निंबाळकर,ज्येष्ठ नेते विश्वास शिंदे, राजेंद्र शेरखाने,माजी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, शहराध्यक्ष युवक अध्यक्ष गणेश पवार धनंजय राऊत, विनोद वीर, ॲड.सिराज मोगल,आप्पा शेळके,अझर पठाण,विजय मुद्दे,खलील सय्यद,अग्निवेश शिंदे,महेबुब पटेल,अशोक शेळके,दिलीप गारगुंड,प्रदीप सस्ते ,हरिभाऊ शेळके ,शहाजी मुंडे,भैया निरफळ ,रोहित कसबे,संजय गजधने,हरिदास शिंदे ,अशोक बनसोडे,अभिमान पेठे,भागवत पेठे ,किशोर राऊत ,बालाजी हुबाले ,बाबा मोमीन,प्रेमानंद सपकाळ,समीर कोरबू,संकेत पडवळ मिलिंद गोवर्धन,प्रभाकर लोंढे,ज्योती सपाटे,जालिंदर केंद्रे ,अप्पा निमसे ,संकेत पडवळ,मिलिंद गोवर्धन काझी जावेद अभिमान पेठे अशोक बनसोडे,भैय्या निरपळ, सरफराज काझी, अभिषेक बागल, मोइज सय्यद, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, पत्रकार परिषदेनंतर शहरातील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात मशाल पेटवून सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादकाँग्रेसखासदार राहुल गांधीधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

राजकीय श्रेयवादाचा फटका प्रशासनालाही? धाराशिव नगरपरिषदेत रिक्त पदांचे संकट; अधिकारी तणावाखाली, बदलीसाठी मंत्रालयाकडे धाव?

Next Post

सत्ताधारी नगरसेवक अभिजित पतंगे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे मांडली रस्ते, स्वच्छता आणि गटारींची बिकट अवस्था

Related Posts

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;
राजकारण

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

August 27, 2026
राजकारण

August 27, 2026
आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;
राजकारण

आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;

August 22, 2026
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;
राजकारण

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;

August 21, 2026
वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का
राजकारण

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

August 18, 2026
घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!
राजकारण

घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!

August 17, 2026
Next Post
सत्ताधारी नगरसेवक अभिजित पतंगे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे मांडली रस्ते, स्वच्छता आणि गटारींची बिकट अवस्था

सत्ताधारी नगरसेवक अभिजित पतंगे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे मांडली रस्ते, स्वच्छता आणि गटारींची बिकट अवस्था

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!