• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

बीडमध्ये किट वाटप घोटाळ्यावर आत्मदहनाचा प्रयत्न; धाराशिवातही कामगार योजनांतील भ्रष्टाचारावर संताप, ‘आशीर्वाद कुणाचा?’

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 2, 2026
in क्राईम
0
बीडमध्ये किट वाटप घोटाळ्यावर आत्मदहनाचा प्रयत्न; धाराशिवातही कामगार योजनांतील भ्रष्टाचारावर संताप, ‘आशीर्वाद कुणाचा?’
0
SHARES
57
VIEWS

बीडमध्ये किट वाटप घोटाळ्यावर आत्मदहनाचा प्रयत्न; धाराशिवातही कामगार योजनांतील भ्रष्टाचारावर संताप, ‘आशीर्वाद कुणाचा?’

बांधकाम कामगारांच्या हक्काच्या योजनांत दलाली, बोगस लाभार्थी आणि लाखोंच्या गैरव्यवहाराचे आरोप; बीडनंतर धाराशिव प्रशासनावरही चौकशीचा दबाव! धाराशिव

धाराशिव – लोकविचार

बीड जिल्ह्यात बांधकाम कामगारांसाठीच्या किट वाटप योजनेत भ्रष्टाचाराचा मोठा भडका उडाला असून, लाभार्थ्यांकडून प्रत्येकी दोन हजार रुपयांची बेकायदेशीर वसुली होत असल्याच्या गंभीर आरोपांमुळे संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी न्याय मिळत नसल्याने दलित पॅंथरचे युवा जिल्हाध्यक्ष प्रेम कांबळे यांनी महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करत प्रशासनाला थेट इशारा दिला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला, मात्र या घटनेने संपूर्ण राज्यातील कामगार विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.बीडमधील या प्रकरणात सरकारी अधिकारी, ठेकेदार आणि एजन्सी यांच्या संगनमतातून गरीब बांधकाम कामगारांची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप होत असताना, धाराशिव जिल्ह्यातही अशाच प्रकारच्या गैरव्यवहारांबाबत अनेक वर्षांपासून सातत्याने तक्रारी होत आहेत. विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि आंदोलकांनी वेळोवेळी आवाज उठवला, आंदोलन केले, निवेदने दिली; मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून ठोस कारवाईचा अभाव दिसून येत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.धाराशिवमध्ये कामगार योजनांमध्ये बोगस लाभार्थी, दलाली, लाभासाठी पैशांची मागणी आणि पात्र कामगारांना योजनांपासून वंचित ठेवण्याचे आरोप वारंवार होत असतानाही, या सर्व प्रकारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे. “या भ्रष्ट यंत्रणेला नेमके आशीर्वाद कुणाचा?” असा सवाल आता सर्वसामान्य कामगारांमधून उपस्थित होत आहे.बीडसारखी धक्कादायक घटना धाराशिवमध्ये घडल्यानंतरच शासन आणि प्रशासन जागे होणार का? कामगारांच्या नावावर सुरू असलेल्या योजनांमधील बोगस लाभार्थी, दलाल आणि संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई होणार का? असे अनेक प्रश्न आता नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून विचारले जात आहेत.राज्य शासनाने तातडीने बीड आणि धाराशिवसह सर्व जिल्ह्यांतील कामगार विभागाच्या योजनांची स्वतंत्र चौकशी करून भ्रष्टाचाराचे जाळे उद्ध्वस्त करावे, अन्यथा कामगारांच्या रोषाचा उद्रेक अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

जळकोट-नळदुर्ग-इटकळमध्ये अवैध धंद्यांचे साम्राज्य; ‘मुख्य बुकींना अभय, मजुरांवरच कारवाई’पत्रकार सुनील बनसोडे यांचा महाराष्ट्र दिनी नळदुर्ग ठाण्यासमोर घंटानादआंदोलन

Next Post

प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; नळदुर्गमध्ये भव्य मोटरसायकल रॅलीने गाजवला महाराष्ट्र दिन

Related Posts

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ
क्राईम

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!
क्राईम

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;
क्राईम

मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;

August 25, 2026
चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

August 25, 2026
गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे
क्राईम

गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे

August 24, 2026
नगरसेवक मोसीन मिर्झाच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ
क्राईम

नगरसेवक मोसीन मिर्झाच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ

August 24, 2026
Next Post
प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; नळदुर्गमध्ये भव्य मोटरसायकल रॅलीने गाजवला महाराष्ट्र दिन

प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; नळदुर्गमध्ये भव्य मोटरसायकल रॅलीने गाजवला महाराष्ट्र दिन

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!