• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; नळदुर्गमध्ये भव्य मोटरसायकल रॅलीने गाजवला महाराष्ट्र दिन

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 2, 2026
in कृषी
0
प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; नळदुर्गमध्ये भव्य मोटरसायकल रॅलीने गाजवला महाराष्ट्र दिन
0
SHARES
161
VIEWS

प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; नळदुर्गमध्ये भव्य मोटरसायकल रॅलीने गाजवला महाराष्ट्र दिन नळदुर्ग (प्रतिनिधी): अझहर शेख.

धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी सध्या निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारच्या धोरणांमुळे दुहेरी संकटात सापडला आहे. थकीत ऊस बिल, पीकविमा आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामात झालेला अन्याय याकडे लक्ष वेधण्यासाठी *शेतकरी संघर्ष समितीच्या* वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून गुळहळळी पाटी ते नळदुर्ग अशी भव्य ‘मोटरसायकल रॅली’ काढण्यात आली. या रॅलीद्वारे शेतकरी नेत्यांनी जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर सडकून टीका केली.प्रशासकीय दिरंगाईवर ‘प्रहार नळदुर्ग येथील अक्कलकोट रोडवर रॅलीची सांगता झाली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना शेतकरी नेते दिलीप जोशी यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “जिल्हा प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे सर्वसामान्य शेतकरी मदतीपासून वंचित राहत आहे. एकीकडे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना शासन तुटपुंजी मदत देऊन थट्टा करत आहे, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही.यावेळी *सरदारसिंग ठाकूर* यांनीदेखील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांचा पाढा वाचला. रॅलीमध्ये प्रामुख्याने खालील मागण्या करण्यात आल्या: राष्ट्रीय महामार्ग ६५२,भूसंपादनाबाबत न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. थकीत ऊस बिले तात्काळ मिळावीत आणि शेतकऱ्यांच्या हिताची ‘एक रुपयात पीकविमा’ योजना पुन्हा सुरू करावी. आर्थिक संकटात असलेल्याशेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क पूर्णतः माफ करून, भरलेले शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे. कूरनूर धरणाच्या कालव्याचे काम अत्यंत निकृष्टदर्जाचे झाले असून त्याचीतात्काळ उच्चस्तरीयचौकशी व्हावी. या मोटरसायकल रॅलीत शेतकऱ्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. यामध्ये व्यंकट पाटील, पंडित पाटील, विक्रम निकम, महेश घोडके, महादेव बिराजदार, पंडित निकम, नरसिंग निकम, आजमोद्दीन शेख, दिलीप पाटील, काशिनाथ काळे, तोलू पाटील, बंडू मोरे, हरी सुरवसे, गुलाब शिंदे यांच्यासह मानसिंग ठाकूर, बालाजी ठाकूर, प्रताप ठाकूर, दशरथसिंग ठाकूर, श्रीकांत पोतदार, पीरपाशा इनामदार व शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना आधीच या मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून, आता रॅलीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सरकारला इशारा दिला आहे की, जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

बीडमध्ये किट वाटप घोटाळ्यावर आत्मदहनाचा प्रयत्न; धाराशिवातही कामगार योजनांतील भ्रष्टाचारावर संताप, ‘आशीर्वाद कुणाचा?’

Next Post

शिंगोलीत उभा राहणार १०६ मीटरचा मध्य रेल्वेचा सर्वात मोठा ‘सिंगल स्पॅन’ पूल! मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Related Posts

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक
कृषी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
कृषी

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

October 2, 2026
दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे
कृषी

दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे

September 26, 2026
जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;
कृषी

जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;

September 26, 2026
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार
कृषी

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार

September 23, 2026
धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!
कृषी

धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!

September 22, 2026
Next Post
शिंगोलीत उभा राहणार १०६ मीटरचा मध्य रेल्वेचा सर्वात मोठा ‘सिंगल स्पॅन’ पूल! मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

शिंगोलीत उभा राहणार १०६ मीटरचा मध्य रेल्वेचा सर्वात मोठा 'सिंगल स्पॅन' पूल! मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!