• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – सौ. अर्चना पाटील

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 23, 2026
in कृषी
0
मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – सौ. अर्चना पाटील
0
SHARES
28
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – सौ. अर्चना पाटील

ग्रामीण भागातील प्रत्येक घरावर सोलर बसविणार बार्शी नाका परिसरातच सीबीएसई शाळा होणार

धाराशिव लोकविचार – मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाच्या घरावर सोलर बसविण्यात येणार आहे. तर १३ वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्याबरोबरच सर्व गावांमध्ये एक गाव एक विद्युत शव दाहिनी बसविण्यात येणार आहे. तसेच गावात प्लास्टिक व प्लॅस्टिक पिशवी वापरण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. गावात प्लास्टिक किंवा प्लॅस्टिक पिशवी आढळून आल्यास ग्रामपंचायतवर १० हजार रुपये तर वैयक्तिक व्यक्तीवर १ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध प्रकारची विकास कामे काम करण्यात येणार आहेत.

या विकास कामाचे आणि कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते दि.२७ जुलै रोजी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी दि.२२ जुलै रोजी दिली.जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या.

यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) तुकाराम भालके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अनंत कुंभार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रवींद्र खंदारे, मग शिक्षणाधिकारी (योजना) नागेश मापारी आणि तुळजापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना पाटील म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय लागावी यासाठी संध्याकाळी सात ते नऊ या दरम्यान टीव्ही बंद राहणार आहे.

या दरम्यान गावातील सर्व टीव्ही व मोबाईल बंद करण्यासाठी भोंगा वाजवण्यात येणार आहे. या निर्णयाचे पालकांनी स्वागत केले असून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापासून शिक्षकापर्यंत प्रत्येक गाव दत्तक देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच १३ लाख वृक्ष लागवड करण्यात येणार असून वृक्षरोपण व त्याचे संगोपन यासाठी त्याला जिओ टॅग बसविण्यात येणार आहेत.

परसबाग, डिजिटल स्कूल, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता ग्रह, हॅन्ड वॉश स्टेशन बांधण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून तेर, खेड, आळणी विद्युत शबदायिनी बसविण्यात येणार असून २०३० पर्यंत जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये विद्युत शव दाहिनी बसविणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून ३७० सोलर वर चालणाऱ्या ३७० घंटागाड्या घेण्यात येणार आहेत.‌

विशेष म्हणजे जिल्ह्यात ८३ अभ्यासिका तयार करण्यात येणार असून एका खोलीसाठी २० लाख, २ लाख रुपयांची पुस्तके व कॉम्प्युटर वायफाय अशी २५ लाख रुपयांची संडास बाथरूम अटॅच अशा परिपूर्ण अत्याधुनिक तयार करण्यात येणार आहेत. याबरोबरच एक गाव, एक जयंती उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक चौकाचे सुशोभीकरण करण्यासह घर तेथे झाड हा उपक्रम देखील राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

तर गावाच्या अंतर्गत व बाह्य रस्त्यावर दुतर्फा वृक्ष लागवड प्लास्टिक बंदी बंदिस्त गटाराद्वारे सांडपाणी व्यवस्थापन, सांडपाण्याचा पुनर्वापर, ओपन जिम, बंदिस्त जिम, सायकल बॅक, सर्व शासकीय, निमशासकीय इमारती रेन वॉटर हार्वेस्टिंग व सौर वीज वापर करण्यात येणार आहेत. महिला बचत गटासाठी प्रशिक्षण कक्ष आणि मी या मुक्त गाव १०० टक्के कुटुंबाकडे आयुष्यमान भारत कार्ड, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सौर ऊर्जा वापर करण्यासाठी प्रोत्साहन, शुद्ध पाणी पुरवठ्याचे स्त्रोत निर्माण करण्यासह १०० टक्के करांचा भरणा करुन घेण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे ग्रामपंचायती ची घरपट्टी नळपट्टी जे नागरिक भरतील त्यासाठी क्यू आर कोड देण्यात येणार असून त्या पैशाचा कुठल्याही प्रकारे घोटाळा होणार नाही यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले……..ग्रामीण भागातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ३७० सोलर घंटागाड्या घेण्यात येणार आहेत. गाव प्लास्टिक मुक्त करून जमा होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ग्रामपंचायतच्या मालकीच्या जागेमध्ये ४० बाय २० चा खड्डा करून त्यामध्ये या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. तसेच यापुढे कोणत्याही वित्त आयोगाच्या निधीतून रस्ता कामासाठी फक्त २० टक्के तर शिक्षण व आरोग्य यासाठी २५ टक्के निधी खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे स्तनदा व गर्भवती मातांना अंगणवाडीच्या माध्यमातून पौष्टिक भोजन उपलब्ध करून दिले जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना एकच ड्रेस कोड असणार जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एकच ड्रेस कोड असणार आहे. त्यामध्ये बुट, टाय, पांढरा पट्टा व कोट असलेला ड्रेस देण्यात येणार आहे. तसेच या शाळेतील विद्यार्थ्यांना टाइम्स ऑफ इंडिया हे दैनिक दररोज जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये उपलब्ध करून त्याचे वाचन करून घेण्यात येणार आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांना क्रमिक अभ्यासाबरोबरच एक दिवस शेतीचा अभ्यास व्हावा यासाठी प्रत्यक्ष शेतातील पीक पद्धतीबाबत ज्ञान उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पाटील यांनी आवर्जून नमूद केले.

विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे वर्ग वाढविण्यासाठी ज्या ठिकाणी सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. त्या ग्रामस्थांनी पुढील वर्ग वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवावा आम्ही त्यास मंजुरी देऊ. कुठल्याही परिस्थितीमध्ये जिल्हा शाळेमध्ये विद्यार्थी जाणार नाहीत यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत असे कळकळीचे आवाहन पाटील यांनी केले.

Lokvichar – लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादजिल्हा परिषद अध्यक्षधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

ऊसतोड कामगारांच्या प्रलंबित कल्याणकारी योजनांबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पुढाकार; समाजकल्याण आयुक्तांसोबत बैठक घेणार

Next Post

बोगस बांधकाम कामगार नोंदणी प्रकरण पुन्हा ऐरणीवर !

Next Post
बोगस बांधकाम कामगार नोंदणी प्रकरण पुन्हा ऐरणीवर !

बोगस बांधकाम कामगार नोंदणी प्रकरण पुन्हा ऐरणीवर !

Recent Posts

  • ‘माऊली’च्या नावावर कोट्यवधींचा खेळ?
  • पत्रकारांच्या प्रश्नांसाठीचा लढा आणखी तीव्र करणार : संदीप काळे
  • ‘लाडक्या ठेकेदाराच्या’ कामावर नागरिकांचा संताप
  • पवनचक्कीचे साहित्य चोरणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
  • तुळजापूरला आवाज उठवणारे लोकप्रतिनिधी कळंबच्या ड्रग्ज प्रकरणात गप्प का?

Recent Comments

  1. vvhfntlqni on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. lsogddnnxq on नववर्षाची भेट : १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण
  3. Kristian Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. shpnjwdonp on नववर्षाची भेट : १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण
  5. Austen Web on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.