• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

‘लाडक्या ठेकेदाराच्या’ कामावर नागरिकांचा संताप

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 9, 2026
in राजकारण
0
‘लाडक्या ठेकेदाराच्या’ कामावर नागरिकांचा संताप
0
SHARES
117
VIEWS

“या या खड्ड्यात पडायला या… मला अजून एक बळी पाहिजे!” धाराशिवच्या ‘लाडक्या ठेकेदाराच्या’ कामावर नागरिकांचा संताप; जीवघेण्या खड्ड्यावरच लावले उपरोधिक होर्डिंग

धाराशिव लोकविचार 

धाराशिव शहरातील जुना उपळा रोड परिसरात सर्व्हिस रोड संपताच निर्माण झालेला तब्बल ५ ते ६ फूट खोल जीवघेणा खड्डा नागरिकांच्या जीवाला धोका ठरत आहे. विशेष म्हणजे या खड्ड्यावर अद्याप स्लॅब टाकण्यात आलेला नसून तो उघडाच ठेवण्यात आल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट खड्ड्यावरच उपरोधिक होर्डिंग लावत संबंधित ठेकेदाराच्या कामकाजाचा निषेध केला आहे.

“या या खड्ड्यात पडायला या… मला अजून एक बळी पाहिजे, त्याशिवाय माझे समाधान होणार नाही… आपलाच धाराशिवचा लाडका ठेकेदार” अशा आशयाचे होर्डिंग नागरिकांनी लावले असून, या फलकाची शहरात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

जुना उपळा रोड परिसरातील हा खड्डा रात्रीच्या वेळी विशेषतः धोकादायक ठरत असून, वाहनचालक तसेच पादचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. रस्त्याचे काम अपूर्ण ठेवून नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, दीड वर्षांपूर्वी याच परिसरात पोदार शाळेतील एका विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले होते. त्या घटनेनंतरही रस्त्याच्या सुरक्षेचा प्रश्न कायम असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पुन्हा एखाद्या निष्पाप व्यक्तीचा बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

“ठेकेदार अजून किती अपूर्ण कामे ठेवणार आणि नागरिकांचा जीव धोक्यात घालणार?” असा सवालही स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. संबंधित विभागाने तातडीने या खड्ड्यावर सुरक्षित स्लॅब टाकून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, येत्या १५ दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास नागरिक स्वतः जेसीबीच्या साहाय्याने सर्व्हिस रोड फोडतील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासन आणि संबंधित ठेकेदार या गंभीर प्रश्नाकडे आता तरी गांभीर्याने पाहणार का, याकडे धाराशिवकरांचे लक्ष लागले आहे.

“सजग नागरिक धाराशिव” यांच्या वतीने लावण्यात आलेल्या या उपरोधिक होर्डिंगमुळे अपूर्ण रस्ते कामे आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलआमदार तानाजीराव सावंतआमदार रोहित पवारउस्मानाबादतुळजापूर विधानसभा आमदार राणाजगजितसिंह पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

पवनचक्कीचे साहित्य चोरणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Next Post

पत्रकारांच्या प्रश्नांसाठीचा लढा आणखी तीव्र करणार : संदीप काळे

Related Posts

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
अतिक्रमणे ७ सप्टेंबरपर्यंत हटवा
राजकारण

अतिक्रमणे ७ सप्टेंबरपर्यंत हटवा

September 4, 2026
Next Post
पत्रकारांच्या प्रश्नांसाठीचा लढा आणखी तीव्र करणार : संदीप काळे

पत्रकारांच्या प्रश्नांसाठीचा लढा आणखी तीव्र करणार : संदीप काळे

ताज्या घडामोडी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!