• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

शिंगोलीत उभा राहणार १०६ मीटरचा मध्य रेल्वेचा सर्वात मोठा ‘सिंगल स्पॅन’ पूल! मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 3, 2026
in महाराष्ट्र
0
शिंगोलीत उभा राहणार १०६ मीटरचा मध्य रेल्वेचा सर्वात मोठा ‘सिंगल स्पॅन’ पूल! मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
0
SHARES
24
VIEWS

शिंगोलीत उभा राहणार १०६ मीटरचा मध्य रेल्वेचा सर्वात मोठा ‘सिंगल स्पॅन’ पूल! मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती धाराशिव-तुळजापूर रेल्वे मार्गाचे काम सुसाट : राष्ट्रीय महामार्गावरून होणार रेल्वेचे क्रॉसिंगमित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती जिल्ह्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या धाराशिव-तुळजापूर रेल्वे मार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पातील अत्यंत कठीण आणि महत्त्वाचा टप्पा असलेल्या शिंगोली जवळील सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे पुलाचे काम आता प्रगतीपथावर आहे. विशेष म्हणजे, मध्य रेल्वेच्या इतिहासातील हा सर्वाधिक लांबीचा १०६ मीटर लांबीचा ‘सिंगल स्पॅन’ पूल ठरणार असल्याची माहिती मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या ८४.४४ किमी लांबीच्या नवीन रेल्वे लाईनचे कामाच्या प्रगतीचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शिंगोळी याठिकाणी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला. सध्या हे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाचा धाराशिव ते तुळजापूर हा पहिला टप्पा मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होण्याचे उद्दिष्ट आहे. तर, सोलापूर ते तुळजापूर हा दुसरा टप्पा त्यानंतर पूर्ण केला जाणार आहे. यामुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. पहिल्या टप्प्यातील प्रकल्पांतर्गत शिंगोली येथे सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गाला क्रॉस करणारा भव्य पूल बांधण्यात येत आहे. तांत्रिकदृष्ट्या हा पूल अतिशय भव्य असून, दोन खांबांमधील अंतर तब्बल १०६ मीटर इतके असणार आहे. एवढ्या मोठ्या अंतराचा ‘सिंगल स्पॅन’ असलेला हा मध्य रेल्वेचा पहिलाच पूल असल्याचे सांगितले जात आहे. पुढील ८-९ महिन्यांत हे काम पूर्ण होणार असून सध्या या ठिकाणी ड्रिलिंग आणि पायाभरणीचे काम वेगात सुरू आहे. पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी साधारणपणे ३ महिन्यांचा कालावधी अपेक्षित असून, त्यानंतर लॉन्चिंग आणि इतर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी ८ ते ९ महिने लागणार आहेत. यासाठी आधुनिक मशिनरी आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. कामादरम्यान महामार्गावरील वाहतुकीचे नियोजन करून पुलाच्या उभारणीचे टप्पे पूर्ण केले जाणार आहेत. या प्रकल्पाच्या प्रगतीमुळे धाराशिवकरांच्या रेल्वे स्वप्नाला आता नवी गती मिळाली असून, स्थानिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.धाराशिव रेल्वे स्थानकाचेही काम प्रगतीपथावरधाराशिव रेल्वे स्थानकापासून या रेल्वे ट्रॅकचे काम शिंगोलीच्या दिशेने वेगाने सरकत आहे. हा नवीन मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर तुळजापूर हे तीर्थक्षेत्र रेल्वेने जोडले जाणार आहे, ज्याचा फायदा लाखो भाविकांना आणि स्थानिक नागरिकांनाही होणार आहे. हा १०६ मीटरचा पूल या मार्गावरील अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना असेल. सध्या ड्रिलिंग सुरू असून पुढील काही महिन्यांत पुलाचा मुख्य सांगाडा उभा राहिलेला सर्वांना पाहायला मिळणार आहे.

Tags: dharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलआमदार राणाजगजितसिंह पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; नळदुर्गमध्ये भव्य मोटरसायकल रॅलीने गाजवला महाराष्ट्र दिन

Next Post

नराधमाचा काळजाला पीळ पाडणारा क्रूरपणा; नसरापूरच्या चिमुरडीसाठी नळदुर्गमध्ये जनक्षोभ!

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post
नराधमाचा काळजाला पीळ पाडणारा क्रूरपणा; नसरापूरच्या चिमुरडीसाठी नळदुर्गमध्ये जनक्षोभ!

नराधमाचा काळजाला पीळ पाडणारा क्रूरपणा; नसरापूरच्या चिमुरडीसाठी नळदुर्गमध्ये जनक्षोभ!

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!