• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

नराधमाचा काळजाला पीळ पाडणारा क्रूरपणा; नसरापूरच्या चिमुरडीसाठी नळदुर्गमध्ये जनक्षोभ!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 3, 2026
in क्राईम
0
नराधमाचा काळजाला पीळ पाडणारा क्रूरपणा; नसरापूरच्या चिमुरडीसाठी नळदुर्गमध्ये जनक्षोभ!
0
SHARES
217
VIEWS

नराधमाचा काळजाला पीळ पाडणारा क्रूरपणा; नसरापूरच्या चिमुरडीसाठी नळदुर्गमध्ये जनक्षोभ!
ब्राह्मण समाज आणि पेशवा युवा संघटनेचे मुख्यमंत्र्यांना साकडे: ‘त्या’ राक्षसाला तात्काळ फासावर लटकवा!

नळदुर्ग (प्रतिनिधी): अझहर शेख,

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका चार वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या नृशंस घटनेचे तीव्र पडसाद आता नळदुर्गमध्ये उमटले असून, दोषी नराधमाला कोणत्याही परिस्थितीत माफी न देता,तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी आक्रमक मागणी ब्राह्मण समाज संघटना व पेशवा युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.या संदर्भात पोलीस प्रशासनामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जाहीर निवेदन धाडण्यात आले असून, समाजात निर्माण झालेला तीव्र संताप या निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे.नसरापूरची घटना ही केवळ गुन्हा नसून माणुसकीला लागलेला कलंक आहे. एका ४ वर्षांच्या चिमुरडीचा वासनांध नराधमाने बळी घेतला. विशेष म्हणजे, संबंधित नराधम हा सराईत गुन्हेगार असून त्याने यापूर्वीही अशाच प्रकारचे कृत्य केल्याचे समोर येत आहे. अशा राक्षसी वृत्तीच्या गुन्हेगारांना समाजात राहण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळवून द्यावा. गुन्हेगाराची क्रूरता पाहता त्याला केवळ आणि केवळ फाशीचीच शिक्षा व्हावी. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण होईल अशी कठोर कारवाई करावी.अशा वासनांध राक्षसी वृत्ती वेळीच ठेचल्या गेल्या पाहिजेत. एका निष्पाप बालिकेची हत्या ही संपूर्ण समाजाची हानी आहे. या नराधमाला कठोर शिक्षा मिळाल्याशिवाय जनक्षोभ शांत होणार नाही.निवेदन सादर करताना नळदुर्गमधील विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रामुख्याने,प्रमोद कुलकर्णी,तालुकाध्यक्ष, पेशवा युवा संघटना, मुकुंद नाईक,अध्यक्ष, ब्राह्मण समाज संघटना, आकाश कुलकर्णी,नगरसेवक, संदीप वैद्य,सचिव, प्रदीप ग्रामोपाध्ये उपाध्यक्ष, तसेच उमेश नाईक, सनी भूमकर, गजानन कुलकर्णी, मयुर भूमकर, नितीन कुलकर्णी व इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता.
आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष राज्य सरकार आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे लागले असून, या नराधमाला कधी फासावर लटकवले जाते, याची प्रतीक्षा सर्वत्र केली जात आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडा#प्रताप सरनाईक #परिवहनमंत्री #देवेंद्र फडणवीस #अजित पवारdharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलआमदार राणाजगजितसिंह पाटीलधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

शिंगोलीत उभा राहणार १०६ मीटरचा मध्य रेल्वेचा सर्वात मोठा ‘सिंगल स्पॅन’ पूल! मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Next Post

भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी मोठी मोहीम सुरू; मुख्याधिकारी नीता अंधारे व नगराध्यक्ष नेहा काकडे यांचा पुढाकार

Related Posts

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला
क्राईम

मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला

September 24, 2026
Next Post
भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी मोठी मोहीम सुरू; मुख्याधिकारी नीता अंधारे व नगराध्यक्ष नेहा काकडे यांचा पुढाकार

भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी मोठी मोहीम सुरू; मुख्याधिकारी नीता अंधारे व नगराध्यक्ष नेहा काकडे यांचा पुढाकार

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!