• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव बस डेपोचा 40 वर्षांचा विकास रखडला; पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनीच घ्यावा आधुनिकीकरणाचा निर्णय

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
April 30, 2026
in महाराष्ट्र
0
धाराशिव बस डेपोचा 40 वर्षांचा विकास रखडला; पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनीच घ्यावा आधुनिकीकरणाचा निर्णय
0
SHARES
129
VIEWS

धाराशिव बस डेपोचा 40 वर्षांचा विकास रखडला; पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनीच घ्यावा आधुनिकीकरणाचा निर्णय

पावसाळ्यात चिखल, कर्मचाऱ्यांची गैरसोय; महाराष्ट्र दिनी कामगारांना न्याय देत धाराशिव आगाराच्या नूतनीकरणाची घोषणा होणार का?

धाराशिव | लोकविचार

धाराशिव बसस्थानक व बस डेपोची उभारणी सन 1980 ते 1985 दरम्यान करण्यात आली. मात्र तब्बल चार ते पाच दशकांचा कालावधी उलटल्यानंतरही बस डेपोमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव कायम असल्याचे वास्तव समोर आले आहे. डेपो परिसरातील काँक्रीटीकरण/डांबरीकरण, अंतर्गत रस्ते, पावसाळी निचरा व्यवस्था यांसारखी अत्यावश्यक कामे यावेळी केली असून त्यानंतर आजपर्यंत तेथील काम न झाल्याने कर्मचाऱ्यांसह चालक-वाहकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.धाराशिव बस डेपोमध्ये दररोज शेकडो बस विविध कामांसाठी दाखल होत असतात. डिझेल भरणे, देखभाल-दुरुस्ती, स्वच्छता, पार्किंग यांसाठी मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र डेपोतील अंतर्गत परिसर अत्यंत जीर्ण झालेला असून पावसाळ्यात संपूर्ण जागा चिखलमय बनते. परिणामी कर्मचाऱ्यांना काम करताना अडचणी निर्माण होतात, वाहन हालचालीत अडथळे येतात आणि कामगारांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो.विशेष म्हणजे राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणारे प्रतापराव सरनाईक यांनी राज्यभर एसटी महामंडळासाठी विविध सुधारणा, बसस्थानकांचे नूतनीकरण आणि नवीन योजनांची अंमलबजावणी केली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असताना स्वतःच्या पालकमंत्रीपदाच्या जिल्ह्यातील धाराशिव बस डेपो मात्र अद्याप मूलभूत विकासापासून वंचित असल्याची भावना नागरिक व कामगारांमध्ये व्यक्त होत आहे.कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव आगारातील कामगारांची व्यथा जाणून घेत, या डेपोच्या काँक्रीटीकरणासह संपूर्ण आधुनिकीकरणासाठी तात्काळ मंजुरी जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. बस डेपोचे आधुनिकीकरण, सुसज्ज सुविधा, स्वच्छ परिसर आणि सुरक्षित कार्यव्यवस्था निर्माण करण्याची सुरुवात धाराशिवमधूनच व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री म्हणून प्रतापराव सरनाईक यांनी या रखडलेल्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत कामगारांना न्याय द्यावा, तसेच धाराशिव बस डेपोचा विकास आराखडा तातडीने मंजूर करून जिल्ह्यात विकासाचा नवा आदर्श निर्माण करावा, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे. महाराष्ट्र दिनी यासंदर्भात मोठी घोषणा होते का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #प्रताप सरनाईक #परिवहनमंत्री #देवेंद्र फडणवीस #अजित पवारdharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकमहाराष्ट राज्य परिवहन महामंडळ
Previous Post

माझ्या कर्मचाऱ्यांवर दबाव टाकाल तर गुन्हा दाखल करणार – अंधारे न.प. सर्वसाधारण सभेत मुख्याधिकाऱ्यांनीच सत्ताधाऱ्यांना सुनावले !

Next Post

धक्कादायक! तुळजापूर तालुक्यात वन्य प्राण्यांचे तांडव; ७५ कोकरांचा एकाच वेळी शिकारीने घेतला बळी!

Related Posts

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
महाराष्ट्र

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
Next Post
धक्कादायक! तुळजापूर तालुक्यात वन्य प्राण्यांचे तांडव; ७५ कोकरांचा एकाच वेळी शिकारीने घेतला बळी!

धक्कादायक! तुळजापूर तालुक्यात वन्य प्राण्यांचे तांडव; ७५ कोकरांचा एकाच वेळी शिकारीने घेतला बळी!

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!