• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

पंचायत समिती मधून समता नगर कडे जाणारा रस्ता तात्काळ खुला करा अन्यथा शिवसेना स्टाईल ने आडवलेला रस्ता उखडून टाकण्याचा इशारा 

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 27, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंचायत समिती मधून समता नगर कडे जाणारा रस्ता तात्काळ खुला करा अन्यथा शिवसेना स्टाईल ने आडवलेला रस्ता उखडून टाकण्याचा इशारा 

धाराशिव नगर परिषद हद्दीतील सर्व्हे नं. 145 मधून 12 मीटर रुंदीचा जिल्हाधिकारी कार्यालय ते समता कॉलनीला जोडणारा रस्ता असून तो पंचायत समितीच्या क्वार्टर समोरुन जातो. या रस्त्यावरुन नागरीकांना दवाखाने, कार्यालय, बँक इत्यादी ठिकाणाला भेट देता येत होती. गेल्या 50 वर्षापासून या रस्त्यावरुन नागरीकांची येण्या-जाण्याची वहिवाट आहे.

शासनाने धाराशिव शहराची विकास योजना मंजूर केली असून या विकास योजनेत या रस्त्याला 12 मी. डी.पी.रोडचा दर्जा आहे. परंतू पंचायत समितीने या रस्त्यावर समता कॉलनीच्या बाजूने सिमेंट पोल आडवे टाकून नागरिकांच्या वहिवाटीला बेकायदेशीर अडथळा केला असून तो रस्ता वहिवाटीसाठी गैरमार्गाने बंद केला आहे. असे करुन पंचायत समिती धाराशिव ही शासनाने मंजूर केलेल्या विकास योजनेच्या प्रस्तावाचे व नगर रचता कायद्याचे उल्लघंन करीत आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या वहिवाटीला बेकायदेशीर प्रतिबंध करीत आहे. जो की हा फौजदारी गुन्हा आहे. असे असताना देखील अचानकपणे कोणतीही पूर्वसूचना न देता हा रस्ता बंद करण्यात आल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व संताप निर्माण झाला आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. सदर रस्ता बंद करण्यामागील कारण स्पष्ट नसल्यामुळे नागरिकांमध्ये विविध शंका उपस्थित होत आहेत. प्रशासनाच्या या मनमानी निर्णयामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्यामुळे जिल्हाधिकारी, धाराशिव यांना सदरील रस्ता तात्काळ खुला करणेबाबतचे निवेदन देण्यात आले व यापुढे जर रस्ता बंद केला तर रस्ता अडवण्यासाठी लावलेलं पोल शिवसेना उखडून टाकणार असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.

यावेळी शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, नगरसेवक राजाभाऊ पवार, पंकज पाटील, अमित उंबरे, राज निकम, ज्ञानदेव करवर, मा. नगरसेवक राणा बनसोडे, संभाजी सलगर, शहर संघटक प्रशांत साळुंके, युवासेना उपजिल्हाप्रमुख निलेश शिंदे, युवासेना तालुकाप्रमुख राकेश सुर्यवंशी, उपशहरप्रुख बंडु आदरकर, विजय ढोणे, युवासेना शहरप्रमुख अभिजीत कदम, शहर संघटक कृष्णा मुंडे, अजिंक्य राजेनिंबाळकर, महेंद्र शिंदे, सह्याद्री राजेनिंबाळकर, हर्षद ठवरे, अक्षय खळदकर, सागर मोरे, मनोज पडवळ, सुनिल गायकवाड, पंकज पडवळ, मनोज उंबरे, सात्वीक दंडनाईक, अमित लाटे, वैभव उंबरे, प्रदिप साळुंके, महेश काटे, मन्सूर काझी, बंटी कादरी, आकाश लाकरे, संभाजी दळवी, प्रशांत जगताप, पंकज स्वामी, हरिदास लोमटे, शिवयोगी चपने, कलीम कुरेशी, संदीप गायकवाड, जुबेर काझी, नाना कळसकर, प्रशांत कोकाटे यांच्यासह स्थानिक नागरीक उपस्थित होते.

Previous Post

धाराशिव नगर परिषद पाण्यासाठी जनता त्रस्त… निर्जन भागात मात्र लाखोंच्या पाईपलाईन! यामागील मुख्य ‘आका’ कोण?

Next Post

हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी (रहे) वेल्फेअर सोसायटीचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा तारीख जाहीर

Next Post

हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी (रहे) वेल्फेअर सोसायटीचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा तारीख जाहीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.