• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी (रहे) वेल्फेअर सोसायटीचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा तारीख जाहीर

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 27, 2026
in सामाजिक
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी (रहे) वेल्फेअर सोसायटीचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा जाहीर

१८ वर्षांची अखंड परंपरा कायम गरजवंत कुटुंबांना मोठा दिलासा – नोंदणीसाठी हुसैनी यांचे आवाहन

उस्मानाबाद | लोकमदत न्यूज 

हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी (रहे) वेल्फेअर सोसायटी, उस्मानाबाद यांच्या वतीने मागील १८ वर्षांपासून अविरत सुरू असलेला मुस्लिम समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येणार आहे. समाजातील गरजवंत कुटुंबांसाठी हा उपक्रम मोठा आधार ठरत आहे.

सदरील सामुदायिक विवाह सोहळा माजी नगरसेवक तथा वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सय्यद नादेर उल्लाह हुसैनी यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी (रहे) दर्गा परिसरातील कव्वाली मैदान येथे विवाह सोहळा पार पडणार आहे.

या सोसायटीच्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो विवाह यशस्वीरीत्या पार पाडण्यात आले असून, समाजात या उपक्रमाबद्दल मोठा विश्वास निर्माण झाला आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना सन्मानाने विवाह लावून देण्याचे कार्य ही संस्था सातत्याने करत आहे.

यंदाच्या विवाह सोहळ्यासाठी नोंदणी प्रक्रिया २८ मार्च २०२६ ते १२ एप्रिल २०२६ या कालावधीत सुरू राहणार आहे. मुलीचे वय किमान १८ वर्षे व मुलाचे वय किमान २१ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. इच्छुक पालकांनी आपल्या मुला-मुलींची नोंदणी लवकरात लवकर करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

नोंदणीसाठी जन्मदाखल्यासह आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असून अधिक माहितीसाठी ९८२२४५९१४० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सय्यद नादेर उल्लाह हुसैनी यांनी केले आहे.

समाजातील एकोपा व सामाजिक बांधिलकी जपणारा हा सामुदायिक विवाह सोहळा यंदाही मोठ्या प्रमाणावर पार पडणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

पंचायत समिती मधून समता नगर कडे जाणारा रस्ता तात्काळ खुला करा अन्यथा शिवसेना स्टाईल ने आडवलेला रस्ता उखडून टाकण्याचा इशारा 

Next Post

नळदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी ७ कोटींचा निधी मंजूर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

Next Post

नळदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी ७ कोटींचा निधी मंजूर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • पावसाळ्यापूर्वी प्रभाग क्र. ९ मधील नाले-गटारी तातडीने साफ करा इनामदार यांची मागणी
  • इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन ; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला
  • बूथ मजबूत तर पक्ष मजबूत राष्ट्रवादी काँग्रेस श. प.पक्षाची संघटनात्मक बैठक संपन्न
  • महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”“शहरातील हायवा गायब
  • “महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”

Recent Comments

  1. Chief Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Chris Webber on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Allen Bell on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Cody Smith on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Carl James on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.