• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

पदवीधर मतदार नोंदणी अभियानात सक्रिय सहभागाचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी

wp@dktechs.in by wp@dktechs.in
October 16, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


पदवीधर मतदार नोंदणी अभियानात सक्रिय सहभागाचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी

धाराशिव – आगामी मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीसाठी पदवीधर मतदार नोंदणी अभियानास सुरुवात झाली आहे. या अभियानाद्वारे धाराशिव जिल्ह्यातील सुशिक्षित वर्गाने लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवून राज्याच्या धोरणनिर्मितीत आपला थेट वाटा उचलावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केले आहे. निवडणूक आयोगाने सन २०२६ मध्ये होणाऱ्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे. या अनुषंगाने १ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत नोंदणी प्रक्रिया पार पडणार आहे. धाराशिव जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली या आठ जिल्ह्यांतील १ नोव्हेंबर २०२२ पूर्वी पदवी प्राप्त केलेले नागरिक नोंदणीस पात्र आहेत. धाराशिव भाजपच्या वतीने जिल्ह्यात, महाविद्यालयांत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे मार्गदर्शन आमदार राणाजगजीतसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर तसेच मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे मतदार प्रमुख आमदार संजयजी केनेकर व मराठवाडा संघटन मंत्री संजयजी कौडगे करत आहेत. जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, युवक मोर्चा व महिला आघाडी पदाधिकारी एकत्रितपणे या अभियानात कार्यरत आहेत. नोंदणी प्रक्रिया संबंधित तहसील कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन पूर्ण करता येते. त्यासाठी पदवी प्रमाणपत्र, ओळखपत्र, आणि निवास दाखला सादर करावा लागतो. जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा आवश्यक सहकार्य करत असून, धाराशिव येथील भाजप जिल्हा कार्यालय प्रतिष्ठान भवन येथे मदत व मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करण्यात आल्याचे सांगितले.

Tags:  bjposmanabadआमदारउस्मानाबादधाराशिवपदवीधर मतदारसंघभारतीय जनता पक्षमराठवाडामहाराष्ट्रसार्वत्रिक निवडणूक 2025
Previous Post

ढोकी येथील बसस्थानकाचे बांधकाम तातडीने सुरू करण्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश!

Next Post

“साई कला केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांचा गंडांतर! अनधिकृत कला केंद्र सील, गुन्हा दाखल करण्याचे आदेश”

Next Post

“साई कला केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांचा गंडांतर! अनधिकृत कला केंद्र सील, गुन्हा दाखल करण्याचे आदेश”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • महाकाली कला केंद्रावर अखेर गंडांतर परवाना रद्द करून 24 तासांत सील, प्रशासनाची मोठी कारवाई
  • ह.भ.प. कल्याणराव चव्हाण यांचे धाराशिव
  • “हायकोर्टाचा कडक दणका! महाकाली कला केंद्रावर सीलची तलवार — नियमभंग उघड, कारवाई अटळ”
  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी

Recent Comments

  1. Aman Katiyar on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.