• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

“साई कला केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांचा गंडांतर! अनधिकृत कला केंद्र सील, गुन्हा दाखल करण्याचे आदेश”

wp@dktechs.in by wp@dktechs.in
October 16, 2025
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS

“साई कला केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांचा गंडांतर! अनधिकृत कला केंद्र सील, गुन्हा दाखल करण्याचे आदेश”
परवाना नसताना कला केंद्र सुरु पोलिस अधीक्षकांच्या अहवालावर कारवाई

धाराशिव दि.१६ (प्रतिनिधी):जिल्ह्यात नियमबाह्य पद्धतीने सुरु असलेल्या कला केंद्रांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. आळणी येथील साई लावणी लोकनाट्य कला केंद्र हे परवाना नसताना सुरु असल्याचे उघड झाल्यानंतर जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी हे कला केंद्र तात्काळ सील करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच केंद्र चालकांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देऊन तहसीलदारांना त्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.
तहसीलदारांच्या अहवालानुसार साई कला केंद्राला कोणताही अधिकृत परवाना मिळालेला नाही. मूळ संचिकेचे अवलोकन केल्यानंतर प्रशासनाने या केंद्राला अनधिकृत ठरवत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी यांनी नमूद केले आहे की, “या प्रकरणात कोणताही विलंब न करता कार्यवाही पूर्ण करून अहवाल सादर करावा.”
पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी या केंद्राविरोधात परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला होता. त्यांच्या शिफारशीवरून जिल्हाधिकारी यांनी गुन्हा नोंदवण्याचा आणि केंद्र सील करण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
धाराशिव जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरु असलेल्या कला केंद्रांवर प्रशासनाची धडक कारवाई सुरू झाली असून पिंपळगाव येथील तुळजाई, येडशी येथील पिंजरा या केंद्रांचा परवाना रद्द करण्यात आला असून दोन्ही ठिकाणी सील कारवाई करण्यात आली आहे. तर नटरंग व चंद्राई कला केंद्रांचे प्रस्ताव कागदपत्रांत त्रुटी असल्याने फेटाळण्यात आले आहेत. तसेच महाकाली कला केंद्राचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.
धाराशिव तालुक्यातील आळणी, पिंपळगाव, चोराखळी, येडशी परिसरात १२ ते १५ कला केंद्रे कार्यरत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. काही ठिकाणी हाणामारी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, खुनाचे प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे घडल्याने पोलिस विभाग सतर्क झाला आहे.
पोलिसांनी अशा केंद्रांना स्पष्ट ताकीद दिली आहे की, बंद खोलीत कार्यक्रम सादर करणे गुन्हा ठरेल. लावणी कार्यक्रम मंचावर व तिकीट पद्धतीनेच सादर करावा, असा नियम असूनही काही केंद्रांमध्ये डीजे लावून बंद खोलीत कार्यक्रम सुरु असल्याचे आढळले. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दबावाला बळी न पडता कारवाई कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन कला केंद्रांना परवाना मिळावा म्हणून काही सत्ताधारी नेत्यांनी शिष्टमंडळासह पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांची भेट घेतली होती. मात्र, पालकमंत्र्यांनी यावर नाराजी व्यक्त करत “नियम मोडणाऱ्यांना मुभा नाही” असे ठणकावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: crimedharashivdharashiv collectordharashiv livedharashiv lokmadat newspoliceतथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईकमहसूल अधिकारी
Previous Post

पदवीधर मतदार नोंदणी अभियानात सक्रिय सहभागाचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी

Next Post

राष्ट्रवादीच्या वतीने काळे आकाश कंदीलासह काळे फुगे फोडून दिवाळी साजरी

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post

राष्ट्रवादीच्या वतीने काळे आकाश कंदीलासह काळे फुगे फोडून दिवाळी साजरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!