• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

वडार समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा द्या अन्यथा मनसे करणार तीव्र आंदोलन

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 11, 2025
in राजकारण
0
0
SHARES
3
VIEWS

धाराशिव, दि.११ऑगस्ट(प्रतिनिधी):धाराशिव शहरातील वडार समाजासाठी कायमस्वरुपी स्मशानभूमीची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून, तातडीने कार्यवाही न झाल्यास नगरपालिकेविरोधात आक्रमक आंदोलन उभारण्याचा इशाराही दिला आहे.

शहरातील कपिलधारा भागात विविध समाजासाठी शासनाने स्वतंत्र स्मशानभूमीची सोय करून शेड, निवारा, रस्ते व पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांची उपलब्धता करून दिली आहे. मात्र, वडार समाजासाठी कोणतीही कायमस्वरुपी स्मशानभूमी उपलब्ध नाही. सध्या वडार समाजातील अंत्यसंस्कार एका खुल्या जागेत होतात, जी खासगी मालकीची असल्याचे समजत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

माती, वडार, गाडी वडार, पाथ्रुड वडार हा सर्व कष्टकरी समाज असून, या समाजाने कपिलधारा परिसरातील इतर समाजांच्या स्मशानभूमीत शेड, निवारा, रस्ते, कंपाऊंडवॉल इत्यादी कामांमध्ये श्रमदानासह मोलाचे योगदान दिले आहे. तरीदेखील नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे वडार समाज कायमस्वरूपी स्मशानभूमीपासून वंचित राहिला असल्याचे मनसे तालुकाध्यक्ष पाशाभाई शेख आणि शहर उपाध्यक्ष राजेंद्र कुऱ्हाडे यांनी सांगितले आहे.

या पार्श्वभूमीवर वडार समाजासाठी स्वतंत्र व कायमस्वरुपी स्मशानभूमीची व्यवस्था तातडीने करण्यात यावी, अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष पाशाभाई शेख यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी धाराशिव यांना सादर करण्यात आले असून, लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न झाल्यास मनसेकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर तालुकाध्यक्ष पाशाबाई शेख, शहर उपाध्यक्ष राजेंद्र कुऱ्हाडे, शिवानंद ढोरमारे तालुका सचिव, फुलचंद जाधव, महेश इटकर, लक्ष्मण गायकवाड, आझाद शेख, अनिल ईटकर, मारुती धोत्रे, संतोष लष्करे आदींच्या सह्या आहेत.

Tags: आंदोलनउस्मानाबादधाराशिवमनसेमोर्चावडार समाज
Previous Post

ॲड. वरुडकर यांचा युक्तिवाद अन् तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील अमृतराव यांचा जामीन मंजूर

Next Post

‘कलंकित’ मंत्र्यांविरोधात ठाकरे पक्षाकडून अनोख्या पद्धतीने आंदोलन! प्रतिकात्मक रमी पत्ते खेळून ,अघोरी पूजा करून, ड्रग्ज व पैसे वाटून केला निषेध

Related Posts

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;
राजकारण

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

August 27, 2026
राजकारण

August 27, 2026
आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;
राजकारण

आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;

August 22, 2026
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;
राजकारण

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;

August 21, 2026
वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का
राजकारण

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

August 18, 2026
घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!
राजकारण

घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!

August 17, 2026
Next Post

'कलंकित' मंत्र्यांविरोधात ठाकरे पक्षाकडून अनोख्या पद्धतीने आंदोलन! प्रतिकात्मक रमी पत्ते खेळून ,अघोरी पूजा करून, ड्रग्ज व पैसे वाटून केला निषेध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!