• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्क्यांवर, घरभाडे भत्त्यातही वाढ – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 11, 2026
in महाराष्ट्र
0
एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्क्यांवर, घरभाडे भत्त्यातही वाढ – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक
0
SHARES
96
VIEWS

एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्क्यांवर, घरभाडे भत्त्यातही वाढ – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

 मुंबई लोकविचार 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे ८६ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा देत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची ऐतिहासिक घोषणा केली. यासोबतच घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

मुंबई सेंट्रल येथील ‘वाहतूक भवन’ या महामंडळाच्या मुख्यालयात कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत सरनाईक यांनी ही घोषणा केली. यावेळी विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी आर्थिक व प्रशासकीय मागण्या मांडल्या. त्यावर सकारात्मक आणि सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे कर्मचारी संघटनांना शुभेच्छा देत महामंडळ अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी सामंजस्याने काम करण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलताना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तात्काळ प्रभावाने एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. तसेच वेतनवाढीची थकबाकी आर्थिक परिस्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्याने अदा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत वेतन, भत्ते, सेवाशर्ती, रिक्त पदभरती, बसस्थानक विकास, कल्याणकारी योजना तसेच महामंडळाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासंदर्भातील विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही देत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीस महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी प्रियंका नारनवरे, वरिष्ठ अधिकारी, विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी तसेच राज्यभरातील कामगार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या आर्थिक स्थितीला मोठा आधार मिळणार आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपरिवहनमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर तुतारीच्या नगरसेवकांची भाजप आमदारांच्या निवासस्थानी भेट!

Next Post

“प्रवाशांना वेठीस धरून आंदोलन नको; उर्वरित मागण्यांवर सरकार सकारात्मक” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Related Posts

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
महाराष्ट्र

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

October 6, 2026
तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित
महाराष्ट्र

तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित

October 4, 2026
तुळजापूर आगार बंदचा इशारा
महाराष्ट्र

तुळजापूर आगार बंदचा इशारा

October 2, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा

October 1, 2026
Next Post
“प्रवाशांना वेठीस धरून आंदोलन नको; उर्वरित मागण्यांवर सरकार सकारात्मक” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

"प्रवाशांना वेठीस धरून आंदोलन नको; उर्वरित मागण्यांवर सरकार सकारात्मक" – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

ताज्या घडामोडी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!