• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर तुतारीच्या नगरसेवकांची भाजप आमदारांच्या निवासस्थानी भेट!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 11, 2026
in राजकारण
0
विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर तुतारीच्या नगरसेवकांची भाजप आमदारांच्या निवासस्थानी भेट!
0
SHARES
890
VIEWS

विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर तुतारीच्या नगरसेवकांची भाजप आमदारांच्या निवासस्थानी भेट! महाविकास आघाडीत खळबळशहर

विकासासाठी चर्चा की राजकीय समीकरणांची जुळवाजुळव? भेटीमागील नेमके कारण गुलदस्त्यात!

धाराशिव लोकविचार

धाराशिव-लातूर-बीड विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच धाराशिवच्या राजकीय वर्तुळात एका भेटीची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाशी संबंधित काही नगरसेवकांनी भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.विशेष म्हणजे भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार सुनील राणे हे जिल्हा दौऱ्यावर असताना ही भेट झाल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे या भेटीचे राजकीय अर्थ लावले जाऊ लागले असून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये सर्व काही आलबेल आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित नगरसेवकांनी आमदारांच्या निवासस्थानी भेट घेतल्याची चर्चा सकाळपासून शहरात खमंग सुरू आहे. मात्र या भेटीमागील नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या समोर आलेले नाही.तर काही नगरसेवकांनी या भेटीला दुजोरा दिला असून विकासाच्या दृष्टिकोनातून भेट घेतली असल्याचे सांगितले.

शहर विकासाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ही भेट झाली होती की आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय घडामोडींचा भाग होती, याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.राजकीय जाणकारांच्या मते, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची मानली जाते. अशा परिस्थितीत विरोधी राजकीय विचारसरणीच्या नेत्यांमधील भेटींकडे विशेष लक्ष वेधले जाणे स्वाभाविक आहे.

दरम्यान, आमदार राणाजगजितसिंह पाटील किंवा संबंधित नगरसेवक यांच्या कार्यालयाकडून या भेटीबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही भेट केवळ सदिच्छा भेट म्हणून पाहावी की त्यामागे काही वेगळी राजकीय गणिते आहेत, याबाबतचे गूढ कायम आहे.

मात्र या घडामोडीमुळे धाराशिवच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, ऐन विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीमध्ये उभी फूट पडून काही नवीन राजकीय समीकरणे आकार घेत आहेत का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadआमदार कैलास पाटीलतुळजापूर विधानसभा आमदार राणाजगजितसिंह पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

“सहा महिने अदृश्य नगरसेवक पावसाळ्याच्या तोंडावर जागे रिल्स काढून स्वच्छतेचा दिखावा की नागरिकांची दिशाभूल?”

Next Post

एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्क्यांवर, घरभाडे भत्त्यातही वाढ – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

Related Posts

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
अतिक्रमणे ७ सप्टेंबरपर्यंत हटवा
राजकारण

अतिक्रमणे ७ सप्टेंबरपर्यंत हटवा

September 4, 2026
Next Post
एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्क्यांवर, घरभाडे भत्त्यातही वाढ – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्क्यांवर, घरभाडे भत्त्यातही वाढ - परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

ताज्या घडामोडी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!