• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

महावितरणात 1.40 कोटींच्या कोटेशन कामांवर प्रश्नचिन्ह; अधीक्षक अभियंता संजय आडे यांच्या चौकशीची मागणी!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 25, 2026
in महाराष्ट्र
0
महावितरणात 1.40 कोटींच्या कोटेशन कामांवर प्रश्नचिन्ह; अधीक्षक अभियंता संजय आडे यांच्या चौकशीची मागणी!
0
SHARES
222
VIEWS

महावितरणात 1.40 कोटींच्या कोटेशन कामांवर प्रश्नचिन्ह अधीक्षक अभियंता संजय आडे यांच्या चौकशीची मागणी!

धाराशिव लोकविचार

महावितरणच्या मनुष्यबळ पुरवठा प्रक्रियेत गंभीर अनियमिततेचे आरोप समोर येत असून, अधीक्षक अभियंता संजय आडे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एप्रिल ते जून 2026 या अवघ्या तीन महिन्यांत कोटेशन पद्धतीने सुमारे 1 कोटी 40 लाख रुपयांची कामे विद्युत सागर सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित, अंबेजोगाई या संस्थेला देण्यात आल्याची चर्चा संबंधित वर्तुळात सुरू आहे.


या प्रकरणानंतर 17 जुलै रोजी शुद्धीपत्रक काढून इतर मनुष्यबळ पुरवठादार संस्था व कंपन्यांच्या कामाचा कालावधी एप्रिलपासून ग्राह्य धरण्यात येईल, असा उल्लेख करण्यात आला. यामुळे संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित संस्थेला टेंडर देताना आवश्यक पात्रतेची काटेकोर पडताळणी झाली का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. जीएसटी, पॅन, ईपीएफ, ईएसआयसी नोंदणी, आवश्यक परवाने, पूर्वानुभव तसेच ई-टेंडर प्रक्रियेतील निकष पूर्ण झाले होते का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.


याशिवाय, संबंधित संस्था जिल्हा मर्यादित नोंदणीची असल्याची चर्चा असून, अशा परिस्थितीत दुसऱ्या जिल्ह्यातील कामे देताना नियमांचे पालन झाले का, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. पात्र संस्थांना डावलून संबंधित संस्थेलाच मोठ्या प्रमाणात कामे देण्यात आल्याचा आरोपही केला जात आहे.


या सर्व आरोपांबाबत अधीक्षक अभियंता संजय आडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. दूरध्वनीद्वारे संपर्क होऊ न शकल्याने त्यांना व्हॉट्सअॅप व टेक्स्ट संदेशाद्वारे प्रतिक्रिया मागविण्यात आली. मात्र वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत त्यांची भूमिका प्राप्त झाली नव्हती.
दरम्यान, टेंडर प्रक्रिया, पात्रता निकष आणि कोटेशनद्वारे मंजूर करण्यात आलेल्या कामांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी संबंधित वर्तुळातून जोर धरत आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: #प्रताप सरनाईक #परिवहनमंत्री #देवेंद्र फडणवीस #अजित पवारdharashivdharashiv collectorMSEBosmanabadउस्मानाबादऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीसघोटाळाटेंडर घोटाळाधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव लोकविचारमहावितरणमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसराज्यमंत्री मेघना बोर्डीकर
Previous Post

स्कॉडा कारची काच फोडून दीड लाखांची चोरी स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपी जेरबंद

Next Post

एस.टी. भाडेवाढ तात्काळ मागे घ्या काँग्रेसचे परिवहन मंत्र्यांना निवेदन

Related Posts

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
महाराष्ट्र

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

October 6, 2026
तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित
महाराष्ट्र

तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित

October 4, 2026
तुळजापूर आगार बंदचा इशारा
महाराष्ट्र

तुळजापूर आगार बंदचा इशारा

October 2, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा

October 1, 2026
Next Post
एस.टी. भाडेवाढ तात्काळ मागे घ्या काँग्रेसचे परिवहन मंत्र्यांना निवेदन

एस.टी. भाडेवाढ तात्काळ मागे घ्या काँग्रेसचे परिवहन मंत्र्यांना निवेदन

ताज्या घडामोडी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!