• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

प्रभाग १७ मध्ये ‘जनतेचा नगरसेवक’ हुसैनी सर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 28, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

प्रभाग १७ मध्ये ‘जनतेचा नगरसेवक’ हुसैनी सर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात
धाराशिव : प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांच्या आग्रहास्तव सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात निस्वार्थी कार्य करणारे माजी नगरसेवक सय्यद नादेरुल्लाह हुसैनी (कालीमुल्लाह) यांनी २०२५ च्या नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या उमेदवारीनंतर प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कामाची ओळख असलेला उमेदवार पुन्हा मैदानात उतरल्यानं चर्चेला उधाण आले आहे.
हुसैनी यांनी 2006 ते 2016 या काळात दोन वेळा नगरसेवक म्हणून काम करताना प्रभागातील रस्ते, गटारे, प्रकाशयोजना, स्वच्छता आणि पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधा उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 2006 मध्ये पहिल्यांदा ते अपक्ष आणि 2011 मध्ये काँग्रेसकडून विजय मिळवून त्यांनी जनतेचा विश्वास सिद्ध केला. याच काळात ते बांधकाम सभापती, स्टँडिंग कमिटी सदस्य तसेच 2016 पासून आरोग्य सेवेशी निगडित रुग्ण कल्याण समितीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक (शिक्षणासाठी)आर्थिक मदत, शैक्षणिक साहित्य वाटप, तसेच मागास कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी विशेष साहाय्य अशा अनेक उपक्रमांमध्ये त्यांनी मोठे योगदान दिले आहे. “शिक्षण हेच समाज उभारणीचे शस्त्र” या त्यांच्या विचारातून अनेक विद्यार्थ्यांना आज चांगल्या पदांवर पोहोचण्याची संधी मिळाली आहे.
समाजकारणातही त्यांचे कार्य व्यापक आहे. 2009 मध्ये स्थापन केलेल्या हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजी रह. वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून आजवर ७०० पेक्षा अधिक सामूहिक विवाह आयोजित करून अनेक कुटुंबांना आधार देण्यात त्यांनी योगदान दिले. २०० हून अधिक विद्यार्थ्यांना मदत, कोविड काळापासून मोफत अॅम्ब्युलन्स सेवा, २६ मशिदींना आर्थिक सहाय्य, तसेच मुस्लिम समाजासाठी ३ एकर जमीन दान देऊन दफनभूमी (कब्रस्तान) ची सोय निर्माण करणे ही त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे.
हुसैनी यांनी पाणीटंचाईग्रस्त भागात स्वखर्चातून बोरवेल व पाणीपुरवठा योजना राबवून जनतेच्या मूलभूत गरजांना प्राधान्य दिले. विकासाबाबत त्यांची संकल्पना स्पष्ट आहे.“स्मार्ट, स्वच्छ आणि शिक्षणयुक्त धाराशिव” हा त्यांचा विचार प्रभागातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने स्वीकारला असल्याचे सांगण्यात येत आहे.
विरोधकांवर टीका करताना हुसैनी म्हणाले की, “दहा वर्षे आश्वासनांपुरतेच काम झाले. आमचे कामच आमचे ओळखपत्र आहे. जनता आता केवळ घोषणांवर नाही तर कामावर विश्वास ठेवते.”
प्रभागात वाढत असलेल्या समर्थनामुळे हुसैनी यांच्या विजयाची शक्यता अधिक बळकट झाली असल्याचे त्यांचे समर्थक कार्यकर्ते म्हणत आहे. मात्र नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे “यावेळी पुन्हा काम करणाऱ्यालाच संधी.”
मात्र मतमोजणीच्या दिवशीच समजेल की जनता कोणाच्या पाठीशी उभी आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

मल्हार पाटील यांच्या उपस्थितीत प्रभाग १४ व १५ मध्ये निघालेल्या भाजपच्या प्रचारफेरीला जनतेचा प्रचंड प्रतिसाद

Next Post

पालकमंत्र्यांच्या आदेशालाच केराची टोपली! धाराशिव बसस्थानकातील उपहारगृहातील गलिच्छ व्यवस्थापनावर प्रवाशांचा संताप!

Related Posts

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे
राजकारण

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
Next Post

पालकमंत्र्यांच्या आदेशालाच केराची टोपली! धाराशिव बसस्थानकातील उपहारगृहातील गलिच्छ व्यवस्थापनावर प्रवाशांचा संताप!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!