• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
September 8, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
165
VIEWS

धाराशिव नगरपरिषदेची अतिक्रमणावर धडक; तुळजाभवानी व्यापारी संकुलातील कारवाईत ‘भेदभाव’चा दुकानदारांचा आरोप!

“६० ते ७० टक्के अतिक्रमणे नागरिकांनी स्वतःहून काढली; पुढेही शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ठोस कारवाई सुरूच राहणार” — अभिजीत गोरे स्वच्छता निरीक्षक न.प. 

धाराशिव लोकविचार 

धाराशिव शहरातील मुख्य रस्ते व सार्वजनिक जागांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने आज अखेर धडक कारवाईला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सेंट्रल बिल्डिंगपर्यंत अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली असून, वाहतूक सुरळीत करणे आणि नागरिकांना सुरक्षित व मोकळा मार्ग उपलब्ध करून देणे हा कारवाईचा उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नगरपरिषद प्रशासनाने यापूर्वी अतिक्रमणधारकांना ७ सप्टेंबरपर्यंत स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले होते. अन्यथा ८ सप्टेंबरपासून प्रशासनाकडून अतिक्रमण हटवून साहित्य जप्त करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आज प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यात आली.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, तुळजाभवानी व्यापारी संकुल, एस.टी. स्टँड परिसर तसेच सेंट्रल बिल्डिंगकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णवाहिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.

‘कारवाई सर्वांवर समान हवी’

मात्र, नगरपरिषद प्रशासनाच्या आजच्या कारवाईनंतर ‘अतिक्रमण हटविताना तोंड पाहून कारवाई केली जात आहे’, असा गंभीर आरोप काही नागरिक व दुकानदारांकडून करण्यात आला आहे. धनदांडग्या व मोठ्या व्यावसायिकांच्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करून फळविक्रेते, चहाच्या टपऱ्या, पानटपऱ्या आणि छोट्या व्यावसायिकांवरच हातोडा चालविला जात असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

तुळजाभवानी शॉपिंग सेंटरमधील दुकानांच्या शटरबाहेरील अतिक्रमण हटविण्याची कारवाईही सुरू करण्यात आली. मात्र, सर्व दुकानांवरील अतिक्रमण समान पद्धतीने हटविले जाणार की केवळ मोजक्याच दुकानदारांवर कारवाई होणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 

काही दुकानदारांना आजची अंतिम मुदत देऊन उद्या कारवाई करण्याचे सांगण्यात आले असल्याची माहिती आहे.

त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने केवळ जुजबी कारवाई न करता मोठा असो वा छोटा, प्रत्येक अतिक्रमणधारकावर समान नियमाने कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. गरीब आणि हातावर पोट असलेल्या छोट्या व्यावसायिकांवरच कारवाईचा हातोडा पडू नये, अशी अपेक्षाही नागरिक व्यक्त करीत आहेत.

विशेष म्हणजे हटविण्यात आलेले काही अतिक्रमणाचे साहित्य नगरपरिषदेच्या जागेतच ठेवण्यात आल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

इतर भागांतही मोहीम राबविण्याची मागणी

मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची नगरपरिषद प्रशासनाची भूमिका स्वागतार्ह असली, तरी ही मोहीम केवळ निवडक ठिकाणांपुरती मर्यादित न राहता संपूर्ण धाराशिव शहरात राबविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

 अतिक्रमणमुक्त शहरासाठी कारवाई करताना कोणताही राजकीय, आर्थिक अथवा व्यावसायिक दबाव न ठेवता सर्वांसाठी समान निकष लागू करावेत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

फळविक्रेते व छोट्या व्यावसायिकांना पर्यायी व्यवस्था अथवा निश्चित जागा उपलब्ध करून देत त्यांचे व्यवसाय सुरू ठेवण्याची संधी देणेही गरजेचे आहे. शहर स्वच्छ, सुंदर आणि वाहतूक कोंडीमुक्त करताना गरिबांच्या उदरनिर्वाहावर गदा येणार नाही, याचीही प्रशासनाने काळजी घ्यावी, अशी मागणी होत आहे.

उपमुख्याधिकारी तथा स्वच्छता निरीक्षक अभिजीत गोरे यांचे आवाहन

“शहरातील अतिक्रमणधारकांना ७ सप्टेंबरपर्यंत स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जवळपास ६० ते ७० टक्के नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले आहे. यापुढे अतिक्रमण होऊ नये यासाठी स्वतंत्र पथक तयार करून शहरात सातत्याने पाहणी केली जाणार आहे. फळविक्रेते व छोटे-मोठे व्यावसायिकांनी हातगाडीवर व्यवसाय करून संध्याकाळी ती घेऊन जावी, जेणेकरून त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होणार नाही.”

“तुळजाभवानी शॉपिंग सेंटरमधील दुकानदारांना शटरबाहेरील अतिक्रमण आज सायंकाळपर्यंत स्वतःहून काढून घेण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. अन्यथा उद्या नगरपरिषद प्रशासनाकडून अतिक्रमण हटवून साहित्य जप्त करण्यात येईल. टप्प्याटप्प्याने संपूर्ण धाराशिव शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी कारवाई सुरू राहणार असून, व्यापारी व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.” — अभिजीत गोरे, उपमुख्याधिकारी तथा स्वच्छता निरीक्षक, धाराशिव नगरपरिषद

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनगर परिषद धाराशिव
Previous Post

‘माऊली’च्या १७.७१ लाखांच्या ८० बिलांचा हिशोब कोण देणार?

Next Post

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

Related Posts

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
महाराष्ट्र

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

October 6, 2026
तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित
महाराष्ट्र

तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित

October 4, 2026
तुळजापूर आगार बंदचा इशारा
महाराष्ट्र

तुळजापूर आगार बंदचा इशारा

October 2, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा

October 1, 2026
Next Post
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

ताज्या घडामोडी

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!