• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

लोहारा तालुक्यातील शेकडो युवकांचा आनंद (तात्या) पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत पक्षप्रवेश

wp@dktechs.in by wp@dktechs.in
October 12, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

लोहारा तालुक्यातील शेकडो युवकांचा आनंद (तात्या) पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत पक्षप्रवेश


लोहारा दि.१२ (प्रतिनिधी):लोहारा तालुक्यातील शेकडो युवकांनी जल्लोषात शिवसेना पक्षात प्रवेश करून नवा उत्साह निर्माण केला. शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवासेना प्रमुख खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यशैलीने प्रेरित होऊन तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या विकासाभिमुख कामकाजाने आकर्षित होऊन युवकांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला.
या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन धाराशिव (युवासेना) लोकसभा अध्यक्ष आनंद (तात्या) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आनंद पाटील यांच्या हस्ते कार्यकर्त्यांच्या गळ्यामध्ये पक्षाचे चिन्ह असलेले भगवा ध्वज खांद्यावर घालून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘एकच वादा, एकनाथ शिंदे आमचा नेता!’ अशा घोषणांनी वातावरण भारून टाकले.
आनंद पाटील यांनी सांगितले की, “शिवसेना हा तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा विचार आजही आमच्या कामाचा मूलमंत्र आहे. युवकांनी शिवसेनेत दाखल होऊन समाजकारणाची नवी दिशा निर्माण करावी.”
धाराशिव जिल्ह्यातील युवकांच्या नेतृत्वक्षमतेला आकार देण्यात आनंद (तात्या) पाटील यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांनी जिल्ह्यात सातत्याने युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि रोजगाराभिमुख उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्यातील शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होत आहे.
यावेळी उपस्थित असलेल्या युवानेते प्रशांत थोरात आणि अप्पा मुळे यांनी नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. या सोहळ्यात वैभव होंडराव, रोहित भोई, प्रतीक गाढवे, शिवदास मोरे, राजेश चपळे, गणेश नरगाळे, यश मोरे, अनिरुद्ध क्षीरसागर, मंगेश कदम, हरिओम गिरी, समर्थ कुंभार, वैभव पाटील, केदार निर्मळे, संदीप कांबळे, सागर पाटील, सवी कांबळे आदींनी शिवसेनेत प्रवेश केला.
पक्षप्रवेशानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. ढोल-ताशांच्या गजरात प्रचंड अतिशाबाजी करीत  भगव्या झेंड्याखाली “जय शिवसेना, जय महाराष्ट्र”च्या घोषणा देत सर्व कार्यकर्त्यांनी पक्षनिष्ठेची शपथ घेतली.

Tags: dharashiv collectordharashiv livedharashiv lokmadat newsउमरगाखासदारडॉ. श्रीकांत शिंदेधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेपक्षप्रवेशयुवासेना लोकसभा अध्यक्ष आनंद पाटीललोहाराशिवसेना
Previous Post

लोकमदत न्यूज इम्पॅक्ट – धाराशिव बसस्थानक घोटाळ्यावर विश्रांती कक्षामध्ये पडलेले छत तात्काळ दुरुस्त.!

Next Post

परवाना रद्द पण पिंजरा कला केंद्र सुरुच!आदेशानंतरही प्रशासन मौन!

Related Posts

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;
राजकारण

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

August 27, 2026
राजकारण

August 27, 2026
आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;
राजकारण

आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;

August 22, 2026
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;
राजकारण

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;

August 21, 2026
वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का
राजकारण

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

August 18, 2026
घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!
राजकारण

घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!

August 17, 2026
Next Post

परवाना रद्द पण पिंजरा कला केंद्र सुरुच!आदेशानंतरही प्रशासन मौन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!