सभासदांना ९ टक्के लाभांश जाहीर; धाराशिव सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात
धाराशिव | लोकविचार
स्वर्गीय बाळासाहेब दंडनाईक यांनी स्थापन केलेल्या धाराशिव सहकारी पतसंस्थेच्या आधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या चेअरमन शुभांगी बाळासाहेब दंडनाईक यांच्या अध्यक्षतेखाली स्वप्नराज मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडली. यावेळी संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने सभासदांना ९ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.
सभेच्या प्रारंभी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच दिवंगत व्यक्तींना उपस्थित मान्यवर व सभासदांनी स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी संस्थेचे प्रस्तावना व अहवाल वाचन सात्विक (भैया) बाळासाहेब दंडनाईक यांनी केले. त्यांनी संस्थेचा लेखापरीक्षण अहवाल सभेसमोर सादर केला. त्यानंतर संचालक मंडळाच्या वतीने सभासदांना ९ टक्के लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली.
सभेस प्रशांत पाटील, विक्रम पाटील, दत्ता (आप्पा) बंडगर, महेबूब पाशा पटेल, देवानंद सुरवसे, मधुकर जाधव, ॲड. सुधाकर तांबे, ॲड. भालचंद्र मोरे यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, सभासद, ठेवीदार, हितचिंतक, मित्रपरिवार व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यवंशी यांनी केले, तर आभार संस्थेचे व्यवस्थापक परवेश सय्यद यांनी मानले.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











