• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

“बोरफळ रस्ता ठरला ‘मृत्यूचा सापळा’; निष्काळजी ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – आमदार कैलास पाटील यांची मागणी”

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 6, 2026
in क्राईम
0
“बोरफळ रस्ता ठरला ‘मृत्यूचा सापळा’; निष्काळजी ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – आमदार कैलास पाटील यांची मागणी”
0
SHARES
89
VIEWS

“बोरफळ रस्ता ठरला ‘मृत्यूचा सापळा’; निष्काळजी ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – आमदार कैलास पाटील यांची मागणी”

धाराशिव – लोकविचार 

शहरातील जिजाऊ चौक ते बोरफळ (राज्य मार्ग क्र. ६८) या रस्त्यावरील अपूर्ण व निष्काळजी कामामुळे आणखी एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्याने संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदरील रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. मात्र काम सुरू असताना आवश्यक सुरक्षाव्यवस्था पूर्णपणे धाब्यावर बसवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संरक्षण कठडे, रेडियम चिन्ह, दिशादर्शक फलक किंवा इशारे नसल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही.

५ मे २०२६ रोजी रात्री सांजा गावाजवळ पुलाच्या कामासाठी खणलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळून भंडारवाडी येथील ओम दिलीप अंधारे या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी दोन दिवसांपूर्वी स्कॉर्पिओ वाहनाचा अपघात होऊन तीन ते चार जण गंभीर जखमी झाले होते, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे.

या सर्व घटनांनंतरही संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्याकडून कोणतीही दखल घेतली नसल्याचा गंभीर आरोप आमदार पाटील यांनी केला आहे. वारंवार सूचना देऊनही सुरक्षाव्यवस्था उभारण्यात आलेली नाही. तसेच, MSIDC मार्फत सुरू असलेल्या या कामासाठी पूर्णवेळ देखरेख करणारा अधिकारी नसल्याने कामाचा दर्जा आणि सुरक्षितता धोक्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

मराठवाडा विभागासाठी केवळ एकच कार्यकारी अभियंता नियुक्त असल्याने कामावर योग्य देखरेख होत नसल्याचेही निवेदनात नमूद आहे. संबंधित अधिकारी कामाच्या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून “आणखी किती जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. अपघातांची मालिका सुरू असताना देखील ठेकेदार व प्रशासन मूकदर्शक का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याप्रकरणी संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

नळदुर्ग नगरपरिषदेमार्फत प्रभाग क्र. ९ मध्ये जन्म-मृत्यू नोंदणी अभियान संपन्न

Next Post

धाराशिवच्या ऐतिहासिक गडांना झळाळी; नळदुर्ग आणि परांडा किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कोट्यवधींचा आराखडा

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post
धाराशिवच्या ऐतिहासिक गडांना झळाळी; नळदुर्ग आणि परांडा किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कोट्यवधींचा आराखडा

धाराशिवच्या ऐतिहासिक गडांना झळाळी; नळदुर्ग आणि परांडा किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कोट्यवधींचा आराखडा

ताज्या घडामोडी

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!