• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिवच्या ऐतिहासिक गडांना झळाळी; नळदुर्ग आणि परांडा किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कोट्यवधींचा आराखडा

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 7, 2026
in महाराष्ट्र
0
धाराशिवच्या ऐतिहासिक गडांना झळाळी; नळदुर्ग आणि परांडा किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कोट्यवधींचा आराखडा
0
SHARES
86
VIEWS

धाराशिवच्या ऐतिहासिक गडांना झळाळी; नळदुर्ग आणि परांडा किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कोट्यवधींचा आराखडा

नळदुर्ग (प्रतिनिधी) अझहर शेख

धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी राज्य शासनाने मोठे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील पर्यटनाचा कणा असलेल्या नळदुर्ग आणि परांडा किल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी ‘महावारसा विशेष स्मारक योजने’ अंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. एकट्या नळदुर्ग किल्ल्यासाठी सुमारे १०.८७ कोटी रुपयांचा सर्वंकष विकास आराखडा तयार करण्यात आला असून, यामुळे या प्राचीन वास्तूचे रूप पालटणार आहे. नळदुर्ग किल्ला हा केवळ ऐतिहासिकच नव्हे, तर स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. या किल्ल्याचा इतिहास , मूळ बांधकाम कल्याणीच्या चालुक्य काळात झाले. सुरुवातीला हा किल्ला मातीची गढी होता. बहामनी काळात (१३५१ ते १४८०) याला भक्कम दगडी स्वरूप प्राप्त झाले. इ.स. १६१३ मध्ये इब्राहिम आदिलशहा (द्वितीय) यांनी बोरी नदीवर बंधारा बांधून जगातील विस्मयकारक अशा ‘पाणी महल’ ची निर्मिती केली. हैदराबाद निजामाच्या ताब्यात राहिलेला हा किल्ला १९५३ पासून संरक्षित स्मारक म्हणून घोषित आहे.आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर, पुरातत्व विभागाने या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी कंबर कसली आहे. नियुक्त वास्तुविशारदांनी १० कोटी ८७ लक्ष ५५ हजार ६९८ रुपयांचा सविस्तर आराखडा तयार केला असून, १६ ऑगस्ट २०२५ रोजी याला प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहे. तटबंदीचे मजबुतीकरण आणि भेगा पडलेल्या भिंतींना ‘ग्राऊटिंग’ करणे. ऐतिहासिक ‘पाणी महल’ आणि ‘उपळी बुरुज’ परिसराची विशेष डागडुजी. परिसरातील झाडेझुडपे काढणे, दगडी पाथवे निर्माण करणे आणि गार्ड रेलिंग बसवणे. परिसराचे शास्त्रोक्त पद्धतीने उत्खनन आणि ऐतिहासिक दस्तऐवजीकरण. पर्यटकांच्या सोयीसाठी दिशादर्शक फलक आणि पायऱ्यांचे बांधकाम. “नळदुर्ग आणि परांडा हे किल्ले धाराशिव जिल्ह्याची ओळख आहेत. या निधीमुळे या वास्तूंचे मूळ सौंदर्य अबाधित राखण्यास मदत होईल. तसेच, पर्यटन वाढल्यामुळे स्थानिक रोजगारालाही मोठी चालना मिळणार आहे.” पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन.गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या किल्ल्यांना आता ‘महावारसा’ योजनेमुळे नवे जीवन मिळणार आहे. प्रशासकीय मान्यता मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. यामुळे इतिहासप्रेमी आणि पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलआमदार राणाजगजितसिंह पाटीलउस्मानाबादतुळजापूर विधानसभाधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनळदुर्ग नगर परिषद
Previous Post

“बोरफळ रस्ता ठरला ‘मृत्यूचा सापळा’; निष्काळजी ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – आमदार कैलास पाटील यांची मागणी”

Next Post

नळदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा: शेख शहबाज अकबर यांची सोलापूर महानगरपालिकेत ‘सिव्हिल इंजिनिअर’ पदी निवड

Related Posts

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
महाराष्ट्र

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

October 6, 2026
तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित
महाराष्ट्र

तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित

October 4, 2026
तुळजापूर आगार बंदचा इशारा
महाराष्ट्र

तुळजापूर आगार बंदचा इशारा

October 2, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा

October 1, 2026
Next Post
नळदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा: शेख शहबाज अकबर यांची सोलापूर महानगरपालिकेत ‘सिव्हिल इंजिनिअर’ पदी निवड

नळदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा: शेख शहबाज अकबर यांची सोलापूर महानगरपालिकेत 'सिव्हिल इंजिनिअर' पदी निवड

ताज्या घडामोडी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!