• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त पिकांचे पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्याची आ.कैलास पाटलांची मागणी

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 18, 2025
in कृषी
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्ह्यातील सर्व महसुली मंडळातील नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्याची आमदार कैलास पाटील यांची मागणी

धाराशिव ता. 18: जिल्ह्यात सर्वच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी, सततचा व ढगफुटी सदृश्य पावसाने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून त्याचा अहवाल शासनास सादर करावा अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
आमदार पाटील यांनी म्हटले की, जिल्हयामध्ये मागील काही दिवसापासुन अतिवृष्टी झाल्याने पेरणी क्षेत्रावरील सोयाबीन, उडीद, मुग, तुर ही सर्वच पिके बाधीत झाली आहेत.
धाराशिव तालुक्यातील धाराशिव ग्रामीण मंडळात 68.8 मिमी, ढोकी मंडळात 168.5 मिमी, जागजी मंडळात 66.3 मिमी, तेर मंडळात 168.5 मिमी, कळंब तालुक्यातील कळंब मंडळात 164.5 मिमी, इटकुर मंडळात 164.5 मिमी, येरमाळा मंडळात 82.3 मिमी, मोहा मंडळात 123.8. मिमी, शिरोढोण मंडळात 117.0 मिमी, गोविंदपूर मंडळात 168.5 मिमी तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग मंडळात 66.0 मिमी भूम तालुक्यातील ईट मंडळात 77.8 मिमी, वाशी तालुक्यातील वाशी मंडळात 145.3 मिमी, पारगाव मंडळात 91.0 मिमी, तेरखेडा मंडळात 82.3 मिमी या महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषत: कळंब तालुक्यातील सर्वच महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने सरासरी 136.8 मिमी पर्जन्याची नोंद झाली आहे. शेतामध्ये पाणी साठुन राहिल्याने सोयाबीन, उडीद, मुग, तुर इत्यादी पिकांची वाढ खुंटली आहे. तसेच फुलगळ झालेली असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात खूप मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.सोयाबीन पिकावर मुळकुज,मानकुज व शेंगकरपा अशा प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. सोयाबीन दिसायला हिरवेगार दिसत असले तरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. त्यामुळे सर्व पिकांचे 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. तसेच कमी वेळात जास्त पाऊस पडल्यामुळे नदीच्या पात्राबाहेर पाणी पडल्याने नदीने वेगळेच पात्र धारण केले आहे. जमिनी खरडून गेल्या आहेत. त्याचेही पंचनामे होणे आवश्यक आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांची जनावरे पुरात वाहून गेली आहेत. अतिवृष्टीने आलेल्या पुरामुळे अनेक घरांची पडझड झाली असून तेथील रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असल्याने हाता तोंडाशी आलेला घास हिराऊन घेतल्याची स्थिती आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले असतानाही नुकसानीचे तात्काळ पंचनामे करणे आवश्यक होते परंतु अद्यापपर्यंत पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले नाहीत. शेतकरी मदतीपासुन वंचित राहण्याची शक्यता असून एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासुन वंचित राहू नये तर याची जबाबदारी प्रशासनाची आहे, अशी भूमिका आमदार पाटील यांनी मांडली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील सर्वच महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी, सततच्या व ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन अहवाल शासनाला सादर करण्याबाबत तात्काळ योग्य कार्यवाही करावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.

Tags: अतिवृष्टीआपत्तीग्रस्त शेतकरीआमदार कैलास पाटीलउस्मानाबादओला दुष्काळकृषीकृषी महाविद्यालयकृषीमंत्रीजिल्हाधिकारीदत्तात्रय भरणे कृषिमंत्रीधाराशिव
Previous Post

“आम्हाला DJ नको” म्हणत लहान मुलांनी शिराढोण करांना घातली भावनिक साद

Next Post

शहरातील पत्त्याच्या क्लबवर अप्पर पोलिस अधीक्षकांच्या स्वतंत्र पथकाची मोठी कारवाई  – प्रतिष्ठित नागरिकांसह अनेक जुगारी अटकेत.!

Next Post

शहरातील पत्त्याच्या क्लबवर अप्पर पोलिस अधीक्षकांच्या स्वतंत्र पथकाची मोठी कारवाई  – प्रतिष्ठित नागरिकांसह अनेक जुगारी अटकेत.!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • पावसाळ्यापूर्वी प्रभाग क्र. ९ मधील नाले-गटारी तातडीने साफ करा इनामदार यांची मागणी
  • इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन ; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला
  • बूथ मजबूत तर पक्ष मजबूत राष्ट्रवादी काँग्रेस श. प.पक्षाची संघटनात्मक बैठक संपन्न
  • महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”“शहरातील हायवा गायब
  • “महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”

Recent Comments

  1. Chief Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Chris Webber on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Allen Bell on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Cody Smith on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Carl James on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.