धाराशिव नगरपरिषदेत आज विशेष मतदार नोंदणी मदत शिबिर नाव शोधणे व अर्ज भरण्यासाठी नागरिकांना मोठी सुविधा
धाराशिव लोकविचार
मतदार यादीच्या पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत अनेक नागरिकांना मतदार यादीमध्ये आपले नाव शोधताना अडचणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिव नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी विशेष मतदार नोंदणी मदत शिबिराचे आयोजन केले आहे.
हे शिबिर आज रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत धाराशिव नगरपरिषद येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात शहरातील सर्व BLO (बूथ लेव्हल अधिकारी) उपस्थित राहून नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन व मदत करणार आहेत.
मतदार यादीत नाव शोधणे, नावाची पडताळणी करणे, नवीन नाव नोंदणी, दुरुस्ती, नाव वगळणे अथवा इतर आवश्यक मतदार नोंदणीचे फॉर्म भरण्यासाठी या शिबिरामध्ये विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. शहरातील कोणत्याही मतदान केंद्राच्या मतदार यादीत नाव असलेल्या नागरिकांना येथे आवश्यक ती माहिती व सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
धाराशिव नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने शहरातील सर्व मतदार बंधू-भगिनींना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. मतदार यादी अचूक व अद्ययावत ठेवण्यासाठी नागरिकांनी या संधीचा लाभ घेत आपली नोंदणी आणि आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी, असेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

