आगीच्या दुर्घटनेत नुकसान झालेल्या भोसले कुटुंबीयांना मल्हार पाटील यांचा मदतीचा दिलासा!
तुळजापूर | लोकविचार
तुळजापूर येथील सारंग नारायण भोसले यांच्या ‘संगीता स्पीकर व सारंग सप्लाय मंडप डेकोरेशन’ या दुकानाला दोन दिवसांपूर्वी अचानक आग लागून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
यावेळी त्यांनी दुकानमालक सारंग भोसले व त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत आगीच्या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे भोसले कुटुंबीयांवर आलेल्या परिस्थितीबद्दल त्यांनी सहवेदना व्यक्त करत कुटुंबीयांना धीर दिला. तसेच या कठीण प्रसंगी आपण भोसले कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला.
आगीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीतून सावरण्यासाठी भोसले कुटुंबीयांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी संबंधित स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासनही मल्हार पाटील यांनी दिले.
यावेळी सारंग नारायण भोसले यांचे कुटुंबीय तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











