राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती; जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून नियुक्तीपत्र प्रदान; संघटना अधिक सक्षम, प्रभावी आणि लोकाभिमुख करण्याची जबाबदारी
धाराशिव | लोकविचार
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन शिवाजीराव तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी अजित ददा पवार यांनी १४ ऑक्टोबर २०२६ रोजी अधिकृत नियुक्तीपत्र देऊन ही नियुक्ती जाहीर केली. या नियुक्तीमुळे धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सचिन तावडे यांच्यावर विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या मान्यतेने सचिन शिवाजीराव तावडे यांची धाराशिव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे, जनसेवेची परंपरा जपणे आणि सर्वसामान्य जनतेप्रती असलेली बांधिलकी अधिक दृढ करणे, या उद्देशाने पक्ष संघटनेत ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
यावेळी मनोज जगताप,आशिष पाटील, असद पठाण, इफ्तेकर मुजावर आदी उपस्थित होते
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियुक्तीपत्राद्वारे सचिन तावडे यांचे अभिनंदन करत त्यांच्या सहकार्याने आणि परिश्रमाने पक्ष संघटना अधिक सक्षम, प्रभावी आणि लोकाभिमुख होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. या नियुक्तीमुळे जिल्ह्यात पक्ष संघटनेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
संघटनात्मक बांधणीचे मोठे आव्हान
धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्रिय करणे, ग्रामीण भागातील जनतेशी संपर्क वाढविणे आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे, अशी महत्त्वाची जबाबदारी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सचिन तावडे यांच्यावर असणार आहे. आगामी काळात पक्षाची जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन
सचिन शिवाजीराव तावडे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे वृत्त समजताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील पक्ष संघटनेला बळ मिळेल आणि जनतेच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्याची संधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, प्रदेश नेतृत्वाने सोपविलेल्या या नव्या जबाबदारीतून सचिन तावडे जिल्ह्यात पक्ष संघटनेला कितपत नवी उभारी देतात आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर कशा पद्धतीने काम करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











