• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिवमध्ये ८० लाखांची रोकड जप्त!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
September 3, 2026
in क्राईम
0
धाराशिवमध्ये ८० लाखांची रोकड जप्त!
0
SHARES
1.6k
VIEWS

धाराशिवमध्ये ८० लाखांची रोकड जप्त! काळया इनोव्हाच्या ‘गुप्त’ कप्प्यातून पैशांचा खेळ उघड

धाराशिव लोकविचार 

सोलापूरहून जालन्याकडे मोठी रोकड घेऊन जाणाऱ्या इनोव्हा कारला धाराशिव शहर पोलिसांनी वडगाव सिद्धेश्वर परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले. MH 21 BQ 8886 क्रमांकाच्या या वाहनातून सुमारे ७५ ते ८० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहर पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांनी वडगाव सिद्धेश्वर / तेरणा इंजिनिअर कॉलेज परिसरात सापळा रचून सदरील वाहन आल्याची खात्री केली. पोलिसांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न केला असता चालकाला संशय आल्याने त्याने वाहन पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी विविध ठिकाणी सापळे लावून वाहनाचा पाठलाग करत ते ताब्यात घेतले.

वाहनाची झडती घेतली असता पाठीमागील बाजूस अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने प्लायवूडची पेटी तयार करून त्यावर साउंड बॉक्स ठेवल्यासारखी रचना करण्यात आली होती. या लपविलेल्या जागेत मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आली. वाहनातील दोन व्यक्तींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सदरील प्रकरणी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्या पथकाने यशस्वी सापळा रचून सदरील वाहन ताब्यात घेतले.

जप्त करण्यात आलेली रोकड नेमकी कोठून आली, कुठे नेली जात होती, तिचा व्यवहाराशी काय संबंध आहे तसेच वाहनातून यापूर्वीही अशाच पद्धतीने पैशांची वाहतूक करण्यात आली होती का, याचा तपास सुरू आहे. रोकड खरी आहे की अन्य काही प्रकार आहे, याचीही चौकशी केली जात आहे.

दरम्यान, पुढील तपासासाठी आयकर विभागाला कळविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जप्त रकमेबाबत न्यायालयीन प्रक्रियेनंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.

२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात रोकड वाहतुकीमागील नेमका ‘खेळ’ काय आहे, याचा उलगडा आता पोलीस आणि संबंधित तपास यंत्रणा करणार का, याकडे धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

कुमार दराडेंचा ‘खाकी’ दणका! पोलिसांची नजर चुकवून पैशांचा प्रवास?

Next Post

अतिक्रमणे ७ सप्टेंबरपर्यंत हटवा

Related Posts

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला
क्राईम

मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला

September 24, 2026
बसस्थानकात पोलिसाच्याच खिशावर डल्ला;
क्राईम

बसस्थानकात पोलिसाच्याच खिशावर डल्ला;

September 24, 2026
Next Post
अतिक्रमणे ७ सप्टेंबरपर्यंत हटवा

अतिक्रमणे ७ सप्टेंबरपर्यंत हटवा

ताज्या घडामोडी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!