• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

कुमार दराडेंचा ‘खाकी’ दणका! पोलिसांची नजर चुकवून पैशांचा प्रवास?

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
September 2, 2026
in क्राईम
0
कुमार दराडेंचा ‘खाकी’ दणका! पोलिसांची नजर चुकवून पैशांचा प्रवास?
0
SHARES
14
VIEWS

कुमार दराडेंचा ‘खाकी’ दणका! पोलिसांची नजर चुकवून पैशांचा प्रवास? धाराशिव शहरात वाहन ताब्यात; आयकर विभागाच्या उपस्थितीत होणार रकमेची मोजणी

धाराशिव शहर पोलिसांची मोठी कारवाई? पैशांनी भरलेले चारचाकी वाहन ताब्यात; रक्कम मोजणीसाठी आयकर विभागाला पाचारण!

धाराशिव लोकविचार 

सोलापूरहून धाराशिवमार्गे एका चारचाकी वाहनातून मोठी रोख रक्कम नेली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर धाराशिव शहर पोलिसांनी सापळा रचून संबंधित वाहन ताब्यात घेतल्याची माहिती विश्वसनीय पोलीस सूत्रांकडून समोर आली आहे. या कारवाईमुळे धाराशिव शहरात एकच खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांना सदर वाहनाबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत संशयित चारचाकी वाहन ताब्यात घेतले. वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

मात्र, सदर रक्कम नेमकी किती आहे, ती कोणाची आहे, कुठे आणि कोणत्या कारणासाठी नेली जात होती तसेच त्या रकमेचा कायदेशीर स्रोत काय आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, रकमेची मोजणी अद्याप करण्यात आलेली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे असून, धाराशिव शहर पोलिसांकडून आयकर विभागाशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रकमेची मोजणी केली जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यानंतरच जप्त करण्यात आलेली रक्कम किती आहे आणि तिच्या वैधतेबाबत पुढील कार्यवाही काय करायची, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

या कारवाईनंतर संबंधित वाहन व रक्कम सोडवून घेण्यासाठी काही मोठे उद्योजक व व्यावसायिक धाराशिव शहर पोलीस ठाण्यात आल्याची चर्चाही सुरू आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. प्रभारी पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांनी रकमेची कायदेशीर पडताळणी झाल्याशिवाय कोणतीही घाईची कारवाई न करण्याची भूमिका घेतल्याने संबंधित व्यक्तींनी तेथून काढता पाय घेतल्याचेही विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, ही कारवाई धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्या पथकाने केल्याचे सूत्रांकडून समजते.

विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलिसांची अधिकृत माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यामुळे वाहनात नेमकी किती रोख रक्कम होती, ती कोणाची होती आणि तिचा स्रोत काय आहे, याबाबत सध्या केवळ सूत्रांकडून मिळालेली माहिती उपलब्ध आहे. अधिकृत तपास व आयकर विभागाच्या पडताळणीनंतरच या प्रकरणाचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

सदरील संपूर्ण बातमी ही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असून पोलिसांच्या अधिकृत माहितीनुसार सत्य समोर येणार आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारosmanabadधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा

Related Posts

क्राईम

September 1, 2026
ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!
क्राईम

ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!

August 31, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;
क्राईम

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ
क्राईम

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!
क्राईम

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;
क्राईम

मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;

August 25, 2026

ताज्या घडामोडी

कुमार दराडेंचा ‘खाकी’ दणका! पोलिसांची नजर चुकवून पैशांचा प्रवास?

कुमार दराडेंचा ‘खाकी’ दणका! पोलिसांची नजर चुकवून पैशांचा प्रवास?

September 2, 2026
दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा

दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा

September 2, 2026
लोहारा–उमरगा विकासासाठी आनंद पाटील यांचा  पाठपुरावा

लोहारा–उमरगा विकासासाठी आनंद पाटील यांचा  पाठपुरावा

September 2, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!