• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
September 2, 2026
in शिक्षण
0
दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा
0
SHARES
0
VIEWS

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आर्थिक सहकार्यातून दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची झाली सोय; सुविधेचे लोकार्पण उत्साहात

वाशी लोकविचार

तालुक्यातील दसमेंगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या पर्यायी निवारा व्यवस्थेचे लोकार्पण मंगळवारी (दि. १ सप्टेंबर) उत्साहात पार पडले. या सुविधेसाठी लागणारी संपूर्ण आर्थिक मदत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली, त्यामुळे विद्यार्थ्यांना हक्काची व सुरक्षित सुविधा उपलब्ध झाली आहे.दसमेंगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच इतर उपक्रमांसाठी पुरेशी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी पर्यायी निवारा उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला होता.

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या कामासाठी सर्व आर्थिक मदत उपलब्ध करून दिल्याने हे काम प्रत्यक्षात साकारले. आमदार तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा परिषद सदस्य सौ. अश्विनी सुनील उंदरे यांच्या प्रयत्नातून या सुविधेचे काम पूर्ण झाले.या पर्यायी निवारा व्यवस्थेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर झाली असून, त्यांना विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी हक्काची जागा मिळणार आहे.

लोकार्पण सोहळ्यास उद्घाटक म्हणून केशव सावंत, एमडी भैरवनाथ शुगर, वाशी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य सौ. अश्विनी सुनील उंदरे, पंचायत समिती वाशीच्या सभापती सौ. प्रणिता प्रविण गायकवाड, उपसभापती नितीन शिवाजीराव रणदिवे, पंचायत समिती सदस्य अशोक भराते, गटविकास अधिकारी जाधव, गटशिक्षणाधिकारी विशाल गायकवाड, विस्तार अधिकारी सोमिनाथ घोळपे आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सहकार्याबद्दल उपस्थितांनी आभार व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शाळा व्यवस्थापन समिती दसमेंगाव यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectorosmanabadआमदार कैलास पाटीलआमदार तानाजीराव सावंतधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकभूम परंडा वाशीविधानसभाशिक्षण
Previous Post

लोहारा–उमरगा विकासासाठी आनंद पाटील यांचा  पाठपुरावा

Related Posts

धाराशिव केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेची पाहणी
शिक्षण

धाराशिव केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
शिक्षकांचे टीईटीतून मुक्त करण्यासह विविध मागण्यासाठी शाळा बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा एल्गार !
शिक्षण

शिक्षकांचे टीईटीतून मुक्त करण्यासह विविध मागण्यासाठी शाळा बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा एल्गार !

July 9, 2026
अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…
शिक्षण

अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…

July 8, 2026
जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती
शिक्षण

जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती

July 4, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षणाला प्रोत्साहन सभापती आकाश तावडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप
शिक्षण

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षणाला प्रोत्साहन सभापती आकाश तावडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

June 27, 2026
आयटीआय विद्यार्थ्यांना भविष्यात मोठ्या संधी : उपजिल्हाधिकारी प्राजक्ता पाटील साळुंखे
शिक्षण

आयटीआय विद्यार्थ्यांना भविष्यात मोठ्या संधी : उपजिल्हाधिकारी प्राजक्ता पाटील साळुंखे

June 16, 2026

ताज्या घडामोडी

दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा

दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा

September 2, 2026
लोहारा–उमरगा विकासासाठी आनंद पाटील यांचा  पाठपुरावा

लोहारा–उमरगा विकासासाठी आनंद पाटील यांचा  पाठपुरावा

September 2, 2026
धाराशिवच्या विकासाला मिळणार गती;

धाराशिवच्या विकासाला मिळणार गती;

September 1, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!