• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षणाला प्रोत्साहन सभापती आकाश तावडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 27, 2026
in शिक्षण
0
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षणाला प्रोत्साहन सभापती आकाश तावडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप
0
SHARES
36
VIEWS

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षणाला प्रोत्साहन सभापती आकाश तावडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

धाराशिव लोकविचार 

भाजपा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून धाराशिव नगर परिषदेचे सभापती तथा कुलस्वामिनी नॅचरल शुगरचे चेअरमन आकाश मधुकरराव तावडे यांच्या वतीने नगर परिषद शाळा क्रमांक १८, भानूनगर येथील विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे (स्कूल बॅग) वाटप करण्यात आले. शिक्षणाला प्रोत्साहन देणारा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना हातभार लावणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना नवीन शालेय दप्तरांचे वितरण करण्यात आले. शैक्षणिक साहित्याचा लाभ मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. वाढदिवसाचे औचित्य साधून समाजोपयोगी कार्य करण्याची परंपरा जपत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

यावेळी बोलताना मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, त्यांच्या शिक्षणासाठी दिलेले हे प्रोत्साहन आणि वाढदिवसाचे औचित्य साधून समाजहिताचे उपक्रम राबविण्याची प्रेरणादायी संकल्पना मनाला विशेष भावल्याचे सांगितले. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याची भावना अशा उपक्रमांतून अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

नगरसेवक आकाश मधुकरराव तावडे यांनी अत्यंत आत्मीयतेने वाढदिवस साजरा करत सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल मल्हार राणाजगजितसिंह  पाटील यांनी त्यांचे तसेच या उपक्रमात योगदान देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. वाढदिवस केवळ शुभेच्छांचा सोहळा न राहता समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची संधी असते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

“समाजासाठी केलेली प्रत्येक छोटी कृती हीच उद्याच्या उज्ज्वल भविष्याची मोठी गुंतवणूक असते,” असे प्रतिपादन करत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केलेली मदत ही भविष्यातील सक्षम समाजनिर्मितीची पायाभरणी असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते मधुकर मामा तावडे, नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे, बांधकाम सभापती अभिजित काकडे, शिक्षण सभापती प्रवीण माळी, स्वच्छता सभापती अक्षय ढोबळे, नगरसेवक राहुल काकडे, धनंजय पाटील, रोहित दांडनाईक, सुशांत सोनवणे, अक्षय जोगदंड, प्रवीण पाठक, तसेच शिक्षकवृंद, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरला. वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक उत्तरदायित्व जपत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिलेले हे योगदान निश्चितच प्रेरणादायी असून, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectorosmanabadआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

धाराशिव शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी धनंजय राऊत संघटन बळकटीसाठी पक्ष नेतृत्वाचा विश्वास

Next Post

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विकासाची भेट! प्रभाग क्रमांक २० मध्ये रस्ते विकासाचे भूमिपूजन

Related Posts

शिक्षण प्रेरणा महोत्सवाचे आयोजन
शिक्षण

शिक्षण प्रेरणा महोत्सवाचे आयोजन

September 11, 2026
दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा
शिक्षण

दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा

September 2, 2026
धाराशिव केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेची पाहणी
शिक्षण

धाराशिव केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
शिक्षकांचे टीईटीतून मुक्त करण्यासह विविध मागण्यासाठी शाळा बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा एल्गार !
शिक्षण

शिक्षकांचे टीईटीतून मुक्त करण्यासह विविध मागण्यासाठी शाळा बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा एल्गार !

July 9, 2026
अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…
शिक्षण

अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…

July 8, 2026
जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती
शिक्षण

जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती

July 4, 2026
Next Post
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विकासाची भेट! प्रभाग क्रमांक २० मध्ये रस्ते विकासाचे भूमिपूजन

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विकासाची भेट! प्रभाग क्रमांक २० मध्ये रस्ते विकासाचे भूमिपूजन

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!