• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

आषाढी यात्रेत एसटी कर्मचाऱ्यांसाठी स्वखर्चातून तीन दिवस भोजन सेवाभावाचा आदर्श – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 24, 2026
in महाराष्ट्र
0
आषाढी यात्रेत एसटी कर्मचाऱ्यांसाठी स्वखर्चातून तीन दिवस भोजन सेवाभावाचा आदर्श – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक
0
SHARES
16
VIEWS

आषाढी यात्रेत एसटी कर्मचाऱ्यांसाठी स्वखर्चातून तीन दिवस मोफत भोजन सेवाभावाचा आदर्श – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

आषाढी यात्रेत एसटी कर्मचाऱ्यांसाठी तीन दिवस मोफत चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था सेवाभावाचा अनोखा आदर्श – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

मुंबई / पंढरपूर लोकविचार 

आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकऱ्यांना सुरक्षित व वेळेवर सेवा देण्यासाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) अधिकारी, कर्मचारी, चालक, वाहक, यांत्रिकीकरण विभागातील कर्मचारी तसेच इतर मदतनीस यांच्यासाठी राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चातून तीन दिवस मोफत चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था केली आहे. २४, २५ आणि २६ जुलै या सलग तीन दिवस हा उपक्रम राबविण्यात येत असून, कर्मचाऱ्यांप्रती असलेली आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपत पांडुरंगाची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

आषाढी यात्रेदरम्यान एसटी महामंडळावर मोठा ताण येत असतो. लाखो भाविकांना त्यांच्या इच्छित स्थळी सुरक्षित पोहोचविण्यासाठी एसटीचे अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस सेवा बजावत असतात. अशा परिस्थितीत त्यांच्या आरोग्याची, सोयी-सुविधांची आणि मनोबलाची काळजी घेणे हीदेखील तितकीच महत्त्वाची जबाबदारी असल्याचे प्रताप सरनाईक यांनी नमूद केले.

“एसटी हे केवळ महामंडळ नसून एक कुटुंब आहे. लाखो प्रवाशांची सेवा करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी स्वखर्चातून भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे,” असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, शासनाच्या प्रशासकीय निर्णयांपुरते मर्यादित न राहता कर्मचाऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची परंपरा जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. “मी केवळ परिवहनमंत्री म्हणून नव्हे, तर एसटी कुटुंबातील एक सदस्य म्हणून ही प्रेमाची भेट कर्मचाऱ्यांना अर्पण करत आहे,” असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

या उपक्रमामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, सेवाभाव, संवेदनशीलता आणि कर्मचारी कल्याणाचा आदर्श समाजासमोर उभा राहील, असा विश्वासही प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. आषाढी यात्रेसारख्या महत्त्वाच्या धार्मिक सोहळ्यात कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहत त्यांना दिलासा देण्याचा हा उपक्रम एसटी कुटुंबासाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपरिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक
Previous Post

धाराशिव केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेची पाहणी

Next Post

स्कॉडा कारची काच फोडून दीड लाखांची चोरी स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपी जेरबंद

Related Posts

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
महाराष्ट्र

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

October 6, 2026
तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित
महाराष्ट्र

तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित

October 4, 2026
तुळजापूर आगार बंदचा इशारा
महाराष्ट्र

तुळजापूर आगार बंदचा इशारा

October 2, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा

October 1, 2026
Next Post
स्कॉडा कारची काच फोडून दीड लाखांची चोरी स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपी जेरबंद

स्कॉडा कारची काच फोडून दीड लाखांची चोरी स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपी जेरबंद

ताज्या घडामोडी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!