• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

दिलेला शब्द पाळला! साडे सांगवी रस्ता-पुलासाठी ₹२.९० कोटींच्या कामास प्रशासकीय मान्यता – पालकमंत्री प्रताप सरनाईक

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 11, 2026
in महाराष्ट्र
0
दिलेला शब्द पाळला! साडे सांगवी रस्ता-पुलासाठी ₹२.९० कोटींच्या कामास प्रशासकीय मान्यता – पालकमंत्री प्रताप सरनाईक
0
SHARES
156
VIEWS

दिलेला शब्द पाळला! साडे सांगवी रस्ता-पुलासाठी ₹२.९० कोटींच्या कामास प्रशासकीय मान्यता – पालकमंत्री प्रताप सरनाईक

धाराशिव लोकविचार

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त साडे सांगवी गावासाठी मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे साडे सांगवी येथील रस्ता व पुलाच्या बांधकामासाठी ₹२ कोटी ९० लाख ५८ हजार खर्चाच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ग्रामविकास विभागाने १० जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, गावाच्या विकासासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टीनंतर साडे सांगवी गावाला भेट देऊन ग्रामस्थांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या होत्या. त्यावेळी पावसामुळे रस्ता व पुलाचे मोठे नुकसान झाल्याने नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले होते. आता त्या आश्वासनाची प्रत्यक्ष पूर्तता झाली आहे.

मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, या कामामुळे साडे सांगवीसह परिसरातील नागरिकांना वर्षभर सुरक्षित आणि अखंड वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेषतः पावसाळ्यात निर्माण होणारे संपर्काचे प्रश्न दूर होऊन शेतकरी, विद्यार्थी व ग्रामस्थांची दळणवळण व्यवस्था अधिक सुरक्षित व सुलभ होईल.

या कामासाठी पालकमंत्री सरनाईक यांनी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांना पत्र पाठवून प्रतिमा-१ ते भोगलगाव साडे सांगवी ते इजिमा-११ ग्राममार्ग क्रमांक ८० वरील पुलाच्या बांधकामासाठी तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. त्यांनी पत्रात नमूद केले होते की, सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टीमुळे या मार्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गावाला भेट देऊन आवश्यक प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले होते.

यानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागाने सुमारे ₹२.९० कोटींचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे सादर केला होता. या प्रस्तावाला तातडीने मंजुरी मिळावी यासाठी पालकमंत्री सरनाईक यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर शासनाने प्रशासकीय मान्यता दिली.

याबाबत प्रतिक्रिया देताना पालकमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “साडे सांगवीच्या ग्रामस्थांना दिलेला शब्द आज पूर्ण होत आहे. जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करणे हीच आमची कार्यपद्धती आहे. या कामामुळे गावाच्या विकासाला गती मिळेल आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होतील.”

या निर्णयासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले.

Lokvichar – लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: dharashiv collectorosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस चा जाहीर पाठिंबा – जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील

Next Post

शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकार ला घ्याव्या लागल्या मागे – प्रतापसिंह पाटील

Related Posts

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र

आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

August 20, 2026
Next Post
शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकार ला घ्याव्या लागल्या मागे – प्रतापसिंह पाटील

शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकार ला घ्याव्या लागल्या मागे - प्रतापसिंह पाटील

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!