• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

तिरट मटका जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; ३.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त, माजी नगराध्यक्षासह अनेक जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 25, 2026
in क्राईम
0
तिरट मटका जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; ३.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त, माजी नगराध्यक्षासह अनेक जणांविरुद्ध गुन्हा दाखल
0
SHARES
286
VIEWS

तिरट मटका जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; ३.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त, माजी नगराध्यक्षासह अनेक जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धाराशिव लोकविचार 

जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करत तिरट मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत रोख रक्कम, मोटारसायकली, मोबाईल व जुगार साहित्य असा एकूण ३ लाख ३४ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ११ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार हे आपल्या पथकासह अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कारवाई करण्यासाठी दि. २५ जून २०२६ रोजी गस्त घालत होते.

दरम्यान, शिवाजी चौक, धाराशिव येथे असताना पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, पाथ्रुड चौक येथील नाझ हॉटेलसमोरील वडारवाडा कमानीच्या आत माजी नगराध्यक्ष विजय मुद्दे यांच्या घरासमोर काही इसम तिरट मटका जुगार खेळत आहेत. माहितीची खातरजमा करून पथकाने नमूद ठिकाणी छापा टाकला.

या कारवाईत तालीम गल्ली, धाराशिव येथील अकलाक शेख, सारोळा ता. जि. धाराशिव येथील प्रभाकर साळुंखे, उंबरे कोठा धाराशिव येथील बाबु ठाकर राठोड, भिमनगर धाराशिव येथील करण वाघमारे, सारोळा (बु.) ता. जि. धाराशिव येथील प्रशांत स्वामी, तालीम चौक धाराशिव येथील शाहेद शेख, बार्शी नाका धाराशिव येथील शेखर शिंदे, खाजानगर धाराशिव येथील समद शेख, पाथ्रुड चौक धाराशिव येथील राजु मुद्दे, सारोळा ता. जि. धाराशिव येथील सागर बाकले, पाथ्रुड चौक धाराशिव येथील विजय मुद्दे हे जुगार खेळत असल्याचे आढळून आले.

यावेळी आरोपींकडून जुगार साहित्य, रोख रक्कम, ३ मोटारसायकली आणि ८ मोबाईल फोन असा एकूण ₹३,३४,०२० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर सर्वांविरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि. अमोल मोरे, पोह/ शौकत पठाण, धयानंद गादेकर, बहीराम शिंदे, दत्तात्रय राठोड, जावेद काझी, प्रकाश औताडे, मपोहा/ शोभा बांगर, पोअं/ पुष्कर मुंगळे, चापोहा/ सुभाष चौरे व चापोअं/ शेरखाने यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकलोकविचार
Previous Post

समाजाने विवेकशील सामाजिक बदल स्विकारणे आवश्यकमहेश नवमी कार्यक्रमात अ‍ॅड. दिपा बियाणी यांचे मत

Next Post

फुटीर खासदारांना कोट्यवधींचे लाभ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post
फुटीर खासदारांना कोट्यवधींचे लाभ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप

फुटीर खासदारांना कोट्यवधींचे लाभ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!