• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

नळदुर्ग येथे ‘अहंकारी वाड्यात’ शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 6, 2026
in महाराष्ट्र
0
नळदुर्ग येथे ‘अहंकारी वाड्यात’ शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न!
0
SHARES
67
VIEWS

नळदुर्ग येथे ‘अहंकारी वाड्यात’ शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न!
शिवराज्याभिषेक हा ‘राष्ट्रीय उत्सव’ म्हणून साजरा व्हावा: विनायक अहंकारी यांची मागणी

नळदुर्ग. प्रतिनिधी अझहर शेख

ऐतिहासिक नळदुर्ग शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सोहळा अत्यंत प्रेक्षणीय आणि उत्साही वातावरणात पार पडला. येथील माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि कट्टर शिवभक्त विनायक अहंकारी यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. विनायक अहंकारी हे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आपल्या निवासस्थानी हा शिवोत्सव साजरा करत असून, यंदाही त्यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेलीअतिशय देखणी आणि सुंदर सजावट सर्वांचे आकर्षण ठरली होती.
सोहळ्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विधिवत दुग्धाभिषेक करून करण्यात आली. जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या मंगलमयी प्रसंगी नळदुर्ग शहरातील राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती लावून शिवरायांना अभिवादन केले,
नगराध्यक्ष बसवराज धरणे माजी नगराध्यक्ष नितीन कासार. आकाश कुलकर्णी.जेष्ठ पत्रकार विलास येडगे, उत्तम बनसगोळे शरद बागल, सरदारसिंह ठाकूर, सुशांत भूमकर, ज्ञानेश्वर घोडके, बलदेवसिंह ठाकूर, नंदकुमार जोशी, वसंत रामदासी, मुकुंद भूमकर, पद्माकर घोडके, श्रमिक पोतदार, सागर हजारे, किशोर जोशी, समीर मोरे, बालाजी कुलकर्णी, मारुती घोडके, पप्पू पाटील, राजेंद्र महाबोले, संतोष वाले, उमेश जाधव, अनिल पाटील, नारायण दोपारे.याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना आयोजक विनायक अहंकारी यांनी शिवराज्याभिषेक दिनाचे ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व विशद केले. छत्रपती शिवरायांचे विचार आणि हा सुवर्णक्षण केवळ एका राज्यापुरता मर्यादित न राहता, शिवराज्याभिषेक हा ‘राष्ट्रीय उत्सव’ म्हणून घोषित झाला पाहिजे आणि तो देशपातळीवर साजरा केला पाहिजे,अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.हा सोहळा भव्य आणि यशस्वी करण्यासाठी विनायक अहंकारी यांच्यासोबत उमेश नाईक, प्रमोद कुलकर्णी, संतोष नाईक, प्रदीप ग्रामोपाध्ये, संदीप वैद्य, राजकुमार वैद्य, अजय देशपांडे, सन्नी भूमकर, सदानंद नाईक, सौरभ रामदासी, नंदकुमार पोतदार, निधी नाईक आणि मयूर जोशी यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.नळदुर्ग शहरातील या उपक्रमाचे आणि अहंकारी परिवाराच्या शिवभक्तीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: छत्रपती शिवाजी महाराजनळदुर्गशिवराज्याभिषेक सोहळा
Previous Post

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश एसटी बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीवर धडक कारवाई

Next Post

एनसीएमसी स्मार्ट कार्डबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका; 199 रुपये शुल्क व 50 ते 100 रुपये टॉप-अप बॅलन्स अनिवार्य – प्रवीण भोंडवे आगार व्यवस्थापक

Related Posts

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
महाराष्ट्र

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

October 6, 2026
तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित
महाराष्ट्र

तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित

October 4, 2026
तुळजापूर आगार बंदचा इशारा
महाराष्ट्र

तुळजापूर आगार बंदचा इशारा

October 2, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा

October 1, 2026
Next Post
एनसीएमसी स्मार्ट कार्डबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका; 199 रुपये शुल्क व 50 ते 100 रुपये टॉप-अप बॅलन्स अनिवार्य – प्रवीण भोंडवे आगार व्यवस्थापक

एनसीएमसी स्मार्ट कार्डबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका; 199 रुपये शुल्क व 50 ते 100 रुपये टॉप-अप बॅलन्स अनिवार्य - प्रवीण भोंडवे आगार व्यवस्थापक

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!