• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

एनसीएमसी स्मार्ट कार्डबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका; 199 रुपये शुल्क व 50 ते 100 रुपये टॉप-अप बॅलन्स अनिवार्य – प्रवीण भोंडवे आगार व्यवस्थापक

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 7, 2026
in महाराष्ट्र
0
एनसीएमसी स्मार्ट कार्डबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका; 199 रुपये शुल्क व 50 ते 100 रुपये टॉप-अप बॅलन्स अनिवार्य – प्रवीण भोंडवे आगार व्यवस्थापक
0
SHARES
52
VIEWS

एनसीएमसी स्मार्ट कार्डबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका; 199 रुपये शुल्क व 50 ते 100 रुपये टॉप-अप बॅलन्स अनिवार्य – प्रवीण भोंडवे धाराशिव एसटी आगार व्यवस्थापक

धाराशिव लोकविचार

: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) कडून प्रवाशांसाठी डिजिटल तिकीट प्रणालीच्या दिशेने एनसीएमसी (NCMC) प्रीपेड स्मार्ट कार्ड सुरू करण्यात आले असून सोशल मीडियावर या कार्ड संदर्भात पसरत असलेल्या विविध अफवा व गैरसमजांना पूर्णविराम देण्यात आला आहे. “कार्ड काढण्याची गरज नाही” किंवा “निर्णय बदलला आहे” अशा प्रकारचे दावे पूर्णतः निराधार व दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
एसटी महामंडळाच्या या डिजिटल उपक्रमांतर्गत एनसीएमसी स्मार्ट कार्ड हे NSDL पेमेंट बँक व एबिक्स कॅश यांच्या सहकार्याने जारी केले जात असून प्रवाशांना कॅशलेस व सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे.
धाराशिव बस स्थानक परिसरात एनसीएमसी कार्ड काढताना 199 रुपये शुल्क घेतले जात असून त्यासोबत 50 ते 100 रुपये इतका किमान टॉप-अप बॅलन्स कार्डमध्ये भरणे बंधनकारक आहे. मात्र काही नागरिकांमध्ये एजंटांकडून अतिरिक्त पैसे घेतल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या तक्रारींमध्ये कोणतेही तथ्य नसून केवळ गैरसमज आणि संभ्रमामुळे अशा तक्रारी निर्माण होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे कार्ड घेतल्यानंतर केवळ ॲक्टिवेशन केल्याने कोणताही लाभ मिळत नाही. कार्डमध्ये ॲक्टिवेशननंतर सात दिवसांच्या आत किमान बॅलन्स टाकणे अनिवार्य आहे. निर्धारित कालावधीत बॅलन्स टाकला नाही तर कार्ड आपोआप निष्क्रिय (डीॲक्टिव्हेट) होऊन एसटी सेवेसाठी वापरता येणार नाही.
त्यामुळे प्रवाशांनी कार्ड घेताना आवश्यक 199 रुपये शुल्कासह 50 ते 100 रुपये टॉप-अप बॅलन्स भरूनच कार्ड घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच गरजेनुसार अधिक रक्कमही कार्डमध्ये भरता येते.
डिजिटल इंडिया उपक्रमाअंतर्गत एसटी महामंडळाची संपूर्ण तिकीट प्रणाली कॅशलेस करण्याचा प्रयत्न सुरू असून प्रत्येक प्रवाशाने एनसीएमसी स्मार्ट कार्डचा स्वीकार करून वेळेत बॅलन्स ठेवावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, कोणाकडून याव्यतिरिक्त जर अतिरिक्त रक्कम मागितली जात असल्यास प्रवाशांनी तात्काळ धाराशिव बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपरिवहन मंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

नळदुर्ग येथे ‘अहंकारी वाड्यात’ शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न!

Next Post

 “सर्वपक्षीय! लाडक्या ठेकेदारामुळे धाराशिवकरांचा जीव धोक्यात”  सर्व्हिस रोड बंद केल्याने संताप

Related Posts

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
महाराष्ट्र

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

October 6, 2026
तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित
महाराष्ट्र

तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित

October 4, 2026
तुळजापूर आगार बंदचा इशारा
महाराष्ट्र

तुळजापूर आगार बंदचा इशारा

October 2, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा

October 1, 2026
Next Post
 “सर्वपक्षीय! लाडक्या ठेकेदारामुळे धाराशिवकरांचा जीव धोक्यात”  सर्व्हिस रोड बंद केल्याने संताप

 “सर्वपक्षीय! लाडक्या ठेकेदारामुळे धाराशिवकरांचा जीव धोक्यात”  सर्व्हिस रोड बंद केल्याने संताप

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!