• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

कन्हेरवाडी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह आरोपी जेरबंद, चोरीची दुचाकी जप्त

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 19, 2026
in क्राईम
0
कन्हेरवाडी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह आरोपी जेरबंद, चोरीची दुचाकी जप्त
0
SHARES
86
VIEWS

धाराशिव – लोकवीचार 

 जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत गावठी कट्ट्यासह एका आरोपीला अटक केली असून चोरीची मोटरसायकलही जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई कन्हेरवाडी पाटी येथे सोमवारी (दि. १८ मे २०२६) दुपारी करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणणे, फरार आरोपींचा शोध घेणे तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी सपोनि अमोल मोरे, पोह राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, मपोह शोभा बांगर व चालक पोकॉ विनायक दहीहांडे यांचे पथक कन्हेरवाडी गावाजवळ आले असता गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, प्रशांत उर्फ भमड्या बालाजी काळे, रा. कन्हेरवाडी ता. कळंब व अशोक नाना पवार, रा. बावी ता. वाशी हे दोघे मोटरसायकलवरून कन्हेरवाडी पाटी येथे येणार असून त्यांच्या ताब्यात अग्नीशस्त्र आहे.

माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास कन्हेरवाडी पाटी येथे संशयित दुचाकीस्वारांना थांबवले. पोलिसांची चाहूल लागताच त्यातील एक इसम गावठी शस्त्र फेकून पळून गेला. तर दुसऱ्या इसमाला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव अशोक नाना पवार, रा. बावी शिवार काटशिवरी पारधी पिढी, ता. वाशी, ह.मु. कन्हेरवाडी ता. कळंब असे सांगितले.

त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी कट्टा आढळून आला. तसेच पळून गेलेल्या साथीदाराचे नाव विशाल उर्फ प्रकाश उर्फ भामड्या बालाजी काळे असल्याचे त्याने सांगितले. आरोपीकडील मोटरसायकल बाबत विचारणा केली असता सदर दुचाकी मुरुड, जि. लातूर येथून चोरी केल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर मुरुड पोलीस ठाण्यात खातरजमा केली असता सदर वाहन चोरीप्रकरणी गुन्हा क्रमांक ०४/२०२५, कलम ३०३ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समोर आले.

पोलिसांनी दोन्ही गावठी कट्टे व चोरीची मोटरसायकल जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार, सपोनि अमोल मोरे, राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, शोभा बांगर व चालक दहीहांडे यांच्या पथकाने केली.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

भूम येथील बौद्ध समाजावरील हल्ल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कठोर कारवाईची मागणी

Next Post

धाराशिव जिल्ह्यात खळबळ! कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post
धाराशिव जिल्ह्यात खळबळ! कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

धाराशिव जिल्ह्यात खळबळ! कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!