• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

भूम येथील बौद्ध समाजावरील हल्ल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कठोर कारवाईची मागणी

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 19, 2026
in क्राईम
0
भूम येथील बौद्ध समाजावरील हल्ल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कठोर कारवाईची मागणी
0
SHARES
50
VIEWS

भूम येथील बौद्ध समाजावरील हल्ल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कठोर कारवाईची मागणी

भूम, दि. 19 मे 2026 : भूम शहरातील भीमनगर परिसरात दि. 15 मे रोजी पवित्र बौद्ध विहार व बौद्ध समाजावर झालेल्या हिंसक हल्ल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक,धाराशिव यांना निवेदन सादर करण्यात आले.

सदर घटनेत बौद्ध समाजाला लक्ष्य करून नियोजनबद्ध पद्धतीने हल्ला करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून, संबंधित आरोपींवर अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989 (ॲट्रॉसिटी ॲक्ट) अंतर्गत कठोर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत दंगल, तोडफोड, धार्मिक भावना दुखावणे, महिलांवर अत्याचार व जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गंभीर कलमे लावण्याची मागणीही करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, दि. 14 मे रोजी अंदाजे 150 ते 200 जणांच्या जमावाने भीमनगर परिसरात घुसून पवित्र बौद्ध विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा परिसर, समाजबांधव व महिलांवर हल्ला करत मोठ्या प्रमाणात दगडफेक व तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले असून बौद्ध समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

याशिवाय, भीमनगर परिसरातील निष्पाप बौद्ध तरुणांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे व F.I.R. No. 303/2026 तात्काळ रद्द करण्यात यावेत, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना शासनामार्फत आर्थिक मदत व मोफत वैद्यकीय उपचार द्यावेत, नुकसानग्रस्त वाहनांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी, तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी स्वतंत्र विशेष तपास पथक (SIT) मार्फत करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

भीमनगर परिसर, पवित्र बौद्ध विहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्यात यावे तसेच परिसरात तातडीने CCTV कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.या निवेदनावर भीमनगर परिसरातील शेकडो बौद्ध बांधव व महिला भगिनींच्या स्वाक्षऱ्या असून त्यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.

“बौद्ध समाजावरील अन्याय कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. प्रशासनाने तात्काळ व निष्पक्ष कारवाई न केल्यास भूम येथे तीव्र मोर्चा आंदोलन उभारण्यात येईल,” असा इशारा आर.पी.आय. (खरात) गटाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी दिला.यावेळी भीम आर्मीचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोक कांबळे, आर.पी.आय. (खरात) गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष महावीर गायकवाड,प्रबुद्ध गायकवाड, बाबासाहेब ओव्हाळ, निवृत्ती हौसलमल यांच्यासह अनेक कार्यकर्ते बौद्ध बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

“रिलस्टार” स्वच्छता सभापतींचा फक्त स्टंटबाजीवर भर; धाराशिव शहर मात्र घाणीच्या विळख्यात

Next Post

कन्हेरवाडी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह आरोपी जेरबंद, चोरीची दुचाकी जप्त

Related Posts

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;
क्राईम

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ
क्राईम

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!
क्राईम

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;
क्राईम

मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;

August 25, 2026
चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

August 25, 2026
गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे
क्राईम

गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे

August 24, 2026
Next Post
कन्हेरवाडी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह आरोपी जेरबंद, चोरीची दुचाकी जप्त

कन्हेरवाडी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह आरोपी जेरबंद, चोरीची दुचाकी जप्त

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!