• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशाने एसटीचे योग्य नियोजन आले कामी यात्राकाळात ६२ लाख ६६ हजारांची घसघशीत कमाई

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
April 15, 2026
in महाराष्ट्र
0
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशाने एसटीचे योग्य नियोजन आले कामी यात्राकाळात  ६२ लाख ६६ हजारांची घसघशीत कमाई
0
SHARES
8
VIEWS

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशाने एसटीचे योग्य नियोजन आले कामी ६२ लाख ६६ हजारांची घसघशीत कमाई

धाराशिव – सर्वसामान्य लोकविचार

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ धाराशिव विभागाच्यावतीने येरमाळा येथील येडेश्वरी यात्रेसाठी भाविकांच्या सेवेसाठी धाराशिव, उमरगा, भूम, तुळजापूर, कळंब व परंडा या आगारातून १२४ बसेस भाविकांच्या सेवेसाठी धावल्या. दि.१ ते ५ एप्रिल दरम्यान १ हजार ३६८ बसच्या फेऱ्या करण्यात आल्या. या माध्यमातून विभागाला ६२ लाख ६६ हजार ५७८ रुपये उत्पन्न झाले असल्याची माहिती विभाग नियंत्रक अजय पाटील यांनी दिली आहे.कळंब तालुक्यातील येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या यात्रेसाठी लाखो भाविक दरवर्षी दर्शन घेण्यासाठी येरमाळा नगरीत दाखल होत असतात. या यात्रे दरम्यान भाविकांची प्रवासाची गैरसोय होऊ नये यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार धाराशिव विभाग नियंत्रक पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व आगार व्यवस्थापक यांच्याशी समन्वय साधून नियोजन केले. त्यामुळे प्रवाशांना प्रवास सुकर आणि सोयीचा करून दिला. या माध्यमातून एसटी महामंडळाच्या उत्पन्नातही देखील घसघशीत भर पडली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धाराशिव विभागाने १ एप्रिल ते ५ एप्रिल या कालावधीत खास भाविकांच्या सोयीसाठी विशेष प्रवास बससेवा राबवली. या कालावधीत धाराशिव, उमरगा, तुळजापूर, कळंब, भूम आणि परंडा या आगारांतून एकूण १२४ बस चालवण्यात आल्या. या बसेनी १३६८ फेऱ्या पूर्ण केल्या. त्यासाठी १० लाख ९३ हजार ३१० किलो मीटर अंतर पार केले. यात्रे दरम्यान १ लाख ४१ हजार ९५५ प्रवाशांनी एसटीचा प्रवास करत एकूण ६२ लाख ६६ हजार ९७८ रुपयांचे उत्पन्न मिळाली आहे. योग्य नियोजन केल्यामुळे यात्रे कालावधीत एका देखील भाविकाला वाहतुकीची अडचण भासली नाही.विशेष म्हणजे, तुळजापूर आणि कळंब आगारांनी सर्वाधिक फेऱ्या आणि उत्पन्न मिळविले आहे. तर धाराशिव आगारातून सर्वाधिक बस सोडण्यात आल्या. यात्रेत लाखो भाविकांची गर्दी असताना देखील शिस्तबद्ध नियोजनामुळे वाहतूक व्यवस्थेवर कोणताही ताण जाणवला नाही किंवा वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली नाही. विशेष म्हणजे नियमितपणे सर्व बसेस भाविकांना नेण्याचे आणि आणण्याचे काम करीत होत्या. पाटील यांच्या नेतृत्वाखाली एसटी अधिकाऱ्यांनी केवळ प्रवाशांची गैरसोय टाळण्यावरच भर दिला नाही, तर एसटीच्या उत्पन्न वाढीकडेही विशेष लक्ष केंद्रित केले. जादा बसची कार्यक्षम नियोजनबद्ध रचना केल्यामुळे उत्पन्नात भर पडली. पालकमंत्री सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग नियंत्रक पाटील यांनी केलेल्या अंमलबजावणीमुळे एसटी महामंडळाने हे उत्पन्न मिळवले आहे. त्यामुळे यात्रेच्या काळात वाहतूक व्यवस्थित पुरवणारी यंत्रणा फक्त एसटी महामंडळात व्यवस्थितपणे पुरवू शकते हे पुन्हा सिद्ध झाले आहे. ………आगार निहाय बसची संख्या, बसच्या एकूण फेऱ्या, कापलेले अंतर किलो मीटरमध्ये, मिळालेले उत्पन्न व प्रवासी संख्या पुढील प्रमाणे – धाराशिव आगार एकूण बस संख्या २२, एकूण केलेल्या फेऱ्या १८६, कापलेले अंतर ११८२३ किलो मीटर, मिळालेले उत्पन्न ८०४८३८ रुपये व प्रवासी संख्या – १२०८७, उमरगा आगार एकूण बस संख्या ७, एकूण फेऱ्या ४४, कापलेले एकूण अंतर ६२३२ किलो मीटर, मिळालेले उत्पन्न ३२६४५९ रुपये व ३६५१ प्रवासी संख्या तसेच भूम आगार एकूण बस संख्या – २१, एकूण केलेल्या बस फेऱ्या – २२८, कापलेले अंतर – १५१११ किलो मीटर, मिळालेले उत्पन्न – १०८८४० रुपये व प्रवासी संख्या – १३८६९ तर तुळजापूर आगार एकूण बस संख्या – २४, एकूण बस फेऱ्या – ३७०, एकूण कापलेले अंतर २८७५४ किलो मीटर, मिळालेले उत्पन्न – १५१८४३८ रुपये व प्रवासी संख्या – २४६९९ तर कळंब आगार एकूण बस संख्या – २४, एकूण केलेल्या फेऱ्या – २६५, कापलेले अंतर – ३०१४१ किलो मीटर, मिळालेले उत्पन्न – १७३३४८७ रुपये व २४६७१ प्रवासी संख्या आणि परंडा आगार बसची संख्या – २०, एकूण केलेल्या फेऱ्या – २७५, एकूण कापलेले अंतर – १७३२२ किलो मीटर, मिळालेले उत्पन्न – ९७४५१६ रुपये व प्रवासी संख्या – १६१३७ अशा एकूण १२३ बसेस विभागातून यात्रेसाठी धावल्या असून त्यांनी १ हजार ३६८ यात्रेसाठी प्रवास फेऱ्या मारल्या तर १ लाख ९ हजार ३९० किलो मीटर अंतर कापले तसेच एकूण मिळालेले उत्पन्न – ६२ लाख ६६ हजार ५७८ रुपये आणि ९४ हजार ११४ प्रवाशांनी यात्रेसाठी हजेरी लावली. एकंदरीतच येडेश्वरी देवी एसटी महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नासाठी पावली असल्याचे चित्र दिसत आहे.

सर्वसामान्य लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: dharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

गॅस एजन्सींमधील कर्मचाऱ्यांसह दलालांचा सुळसुळाट! परस्पर बुकिंग, ओटीपी घोटाळा!

Next Post

अमृत 2.0 मुळे नळदुर्गचा पाणीप्रश्न मार्गी भवानीनगर-रहिमनगरात विकासकामांचा वेग!

Related Posts

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
महाराष्ट्र

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
Next Post
अमृत 2.0 मुळे नळदुर्गचा पाणीप्रश्न मार्गी भवानीनगर-रहिमनगरात विकासकामांचा वेग!

अमृत 2.0 मुळे नळदुर्गचा पाणीप्रश्न मार्गी भवानीनगर-रहिमनगरात विकासकामांचा वेग!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!