बेंबळी गावात अनधिकृत लाकूड कापणीचे स्वा मिल मशीन सुरू? वनविभाग झोपेत की ‘आशीर्वाद’?
परवाना, नूतनीकरण आणि देखरेखीवर प्रश्नचिन्ह नियमबाह्य असल्यास कारवाई कधी?
धाराशिव | लोकमदत न्यूज
धाराशिव तालुक्यातील बेंबळी गावात अनधिकृत पद्धतीने लाकूड कापणी करणारी दोन ते तीन मशीन (सॉमिल) राजरोसपणे सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. मात्र, ही माहिती अधिकृतरीत्या अद्याप पुष्टी झालेली नसून, यामागील सत्य काय आहे याबाबत प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
बेंबळी गावातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित सॉमिल परवानगीशिवाय किंवा नियमांचे उल्लंघन करून सुरू असल्याची चर्चा आहे. जर हे खरे असेल, तर अशा यंत्रणांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणत्या विभागाची आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
सामान्यतः लाकूड कापणी व सॉमिलसंदर्भात परवाना देणे, त्याचे नूतनीकरण करणे व देखरेख ठेवणे ही जबाबदारी वनविभाग (Forest Department) तसेच स्थानिक प्रशासनाची असते. परवान्यांचे नूतनीकरण नियमानुसार करण्यात आले आहे का? आणि झाले असल्यास कोणत्या निकषांवर करण्यात आले? याबाबत स्पष्टता आवश्यक आहे.
जर संबंधित सॉमिलना परवाना देण्यात आला असेल, तर त्यामागील प्रक्रिया पारदर्शक होती का? की कोणाच्या ‘आशीर्वादाने’ हे उद्योग सुरू आहेत? असा संशयही नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, जर या मशीन खरोखरच अनधिकृत असतील आणि मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असेल, तर पर्यावरणीय हानीसह कायद्याचे उल्लंघनही गंभीर ठरू शकते. अशा परिस्थितीत जबाबदार कोण? आणि संबंधितांवर कारवाई कधी होणार? असे सवाल उपस्थित होत आहेत.
यासंदर्भात प्रशासनाने तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, तसेच नियमबाह्य काही आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
भाग एक… अधिक वस्तुनिष्ठ माहितीसह भाग दोन लवकरच
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

