चिखलीत मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांची जाहीर सभा उत्साहात… तानाजी शिंदे व विकास गोरे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन
लोकमदत न्यूज
जिल्हा परिषदेच्या सांजा गटातील भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार तानाजी शंकर शिंदे तसेच चिखली पंचायत समिती गणातील उमेदवार विकास विठ्ठल गोरे यांच्या प्रचारासाठी चिखली येथे मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांची जाहीर सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेला कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली.
सभेत बोलताना मल्हार पाटील म्हणाले की, सांजा गटातून विरोधकांनी धनदांडगा व शहरातील उमेदवार दिलेला असताना महायुतीने मात्र सर्वसामान्यांच्या हक्काचा, मातीतला व तळागाळातील कार्यकर्ता तानाजी शिंदे यांना उमेदवारी देऊन मतदारांच्या भावना व विश्वासाचा सन्मान केला आहे. अशा सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी आम्ही सर्वजण खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“तानाजी शिंदे यांना दिलेले प्रत्येक मत म्हणजेच मल्हार पाटील यांना दिलेले मत आहे,” असे ठामपणे सांगत त्यांनी शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. तसेच चिखली पंचायत समिती गणातील महायुतीचे उमेदवार विकास विठ्ठल गोरे आणि सांजा गणातील उमेदवार आशाताई भारत विधाते यांनाही प्रचंड मतांनी विजयी करून पंचायत समितीत पाठवण्याची विनंती त्यांनी मतदारांना केली.
या सभेला राजाभाऊ पाटील, सौ. प्रीतीताई कदम, व्यंकट पाटील, मार्तंड भोजने, भागवत कोंदे, तेजस सुरवसे, दुष्यंत चोबे, कुंद पाटील, सिद्धेश्वर गवळी, व्यंकट साळुंके, जलराज चोबे, रवी घुटे यांच्यासह चिखली गणातील प्रमुख कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786


