• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

युवानेते सिद्दीक तांबोळी यांची युवासेना जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती… शिवसेनेच्या युवक संघटनात नवचैतन्य

wp@dktechs.in by wp@dktechs.in
January 27, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

सांजा येथील युवानेते सिद्दीक तांबोळी यांची युवासेना जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती… शिवसेनेच्या युवक संघटनात नवचैतन्य

धाराशिव लोकमदत न्यूज

सांजा येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सक्रिय, निष्ठावंत व जनसंपर्क असलेले युवानेते सिद्दीक तांबोळी यांची युवासेनेच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे तालुका तसेच जिल्हा पातळीवर युवासेनेच्या संघटनात्मक कार्याला नवे बळ मिळणार असून, युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही नियुक्ती खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील तसेच शिवसेना सहसंपर्कप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. पक्ष नेतृत्वाने सिद्दीक तांबोळी यांच्या सामाजिक बांधिलकीची, युवकांमध्ये असलेल्या लोकप्रियतेची तसेच पक्षासाठी सातत्याने केलेल्या कामगिरीची दखल घेत ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.
या प्रसंगी सांजा परिसरातील विविध समाजघटकांतील नागरिक, युवक, शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तांबोळी यांच्या निवडीमुळे परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले असून, विशेषतः युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
सिद्दीक तांबोळी यांनी यापूर्वी अनेक सामाजिक उपक्रम, युवक प्रश्नांवरील आंदोलने, जनहिताच्या मागण्या तसेच पक्ष संघटन बळकट करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या अनुभवाचा व कार्यक्षमतेचा उपयोग युवासेनेच्या संघटनात्मक विस्तारासाठी निश्चितच लाभदायक ठरेल, असा विश्वास पक्ष नेत्यांनी व्यक्त केला आहे.
या नियुक्तीमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवक संघटनेला नवी दिशा मिळणार असून, आगामी काळात युवासेनेचे कार्य अधिक गतिमान, प्रभावी व लोकाभिमुख होईल, अशी आशा कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

अवैध कला केंद्रांवर पालकमंत्र्यांचा कडक इशारा….वेशांतर(ग्राहक बनून) करून कारवाई करणार – प्रताप सरनाईक

Next Post

चिलवडी परिसरात भाजपला खिंडार; माजी उपसरपंच अजित सावंत व संतोष राजगुरूंचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
Next Post

चिलवडी परिसरात भाजपला खिंडार; माजी उपसरपंच अजित सावंत व संतोष राजगुरूंचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!