• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

अवैध कला केंद्रांवर पालकमंत्र्यांचा कडक इशारा….वेशांतर(ग्राहक बनून) करून कारवाई करणार – प्रताप सरनाईक

wp@dktechs.in by wp@dktechs.in
January 27, 2026
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS

अवैध कला केंद्रांवर पालकमंत्र्यांचा कडक इशारा…. वेशांतर(ग्राहक बनून) करून कारवाई करणार – प्रताप सरनाईक


धाराशिव लोकमदत न्यूज

धाराशिव जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध कला केंद्रांवर पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी कठोर भूमिका घेत तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. यापूर्वी अवैधरीत्या सुरू असलेली तुळजाई, कालिका, साई, गौरी आणि पिंजरा ही पाच कला केंद्रे सील करण्याचे आदेश देण्यात आले होते, तर महाकाली कला केंद्र न्यायालयीन प्रकरणामुळे स्थगितीवर सुरू आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही कला केंद्रे अधिकाऱ्यांच्या संगनमताने पुन्हा राजरोस सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमदत न्यूज’ने वारंवार प्रसिद्ध केले होते.
25 जानेवारी रोजी धाराशिव दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री सरनाईक यांच्याकडे ‘लोकमदत न्यूज’च्या प्रतिनिधींनी अवैध कला केंद्रे समोरून बंद तर पाठीमागून सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना पालकमंत्री म्हणाले, “सदरील कला केंद्र सुरू असल्याच्या तक्रारी व एसएमएस माझ्याकडे आले आहेत. याची मी गंभीर दखल घेत असून २६ जानेवारी रोजी झेंडावंदन झाल्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देणार असल्याचे सांगत जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध कला केंद्र सुरू होऊ देणार नाही. त्यावर कठोर कारवाई केली जाईल” असे सांगितले.
26 जानेवारी रोजी झेंडावंदनानंतर पत्रकारांनी या संदर्भात विचारले असता पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना तात्काळ चौकशी करून कडक कारवाईचे आदेश जाहीर केले. मात्र त्यानंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी केलेल्या तपासणीत “कला केंद्र” बंद असल्याचे निदर्शनास आले” असे गोलमाल उत्तर दिले गेले, ज्यामुळे संभ्रम निर्माण झाला. याची गंभीर दखल घेत पालकमंत्री सरनाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांना जिल्ह्यातील सर्व कला केंद्रांची अचूक माहिती गोळा करण्याचे आदेश दिले असून, “मी स्वतः साध्या वेशात ग्राहक बनून या कला केंद्रांमध्ये जाऊन प्रत्यक्ष स्थिती तपासणार आहे,” अशी घोषणा केली.
दरम्यान, न्यायालयीन स्थगितीवर सुरू असलेल्या महाकाली कला केंद्राबाबतही नियमांची पायमल्ली होत असल्याच्या तक्रारी शेजारील गावकऱ्यांकडून येत आहेत. मात्र न्यायालयीन प्रक्रियेचा आधार घेत या केंद्रावर कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
पालकमंत्री सरनाईक यांनी घेतलेल्या कडक भूमिकेचे जिल्हाभरातून कौतुक होत असून, प्रशासन आता नेमकी कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अवैध कला केंद्रांवर पालकमंत्र्यांची वेशांतरातील कारवाई प्रत्यक्षात उतरते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

याहिया सुहेल अहमद काझी यांच्या हस्ते क्रांतीसुर्य अण्णासाहेब पाटील सोशलवर्क कॉलेज मध्ये ध्वजारोहण संपन्न

Next Post

युवानेते सिद्दीक तांबोळी यांची युवासेना जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती… शिवसेनेच्या युवक संघटनात नवचैतन्य

Related Posts

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;
क्राईम

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ
क्राईम

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!
क्राईम

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;
क्राईम

मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;

August 25, 2026
चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

August 25, 2026
गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे
क्राईम

गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे

August 24, 2026
Next Post

युवानेते सिद्दीक तांबोळी यांची युवासेना जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती... शिवसेनेच्या युवक संघटनात नवचैतन्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!