• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का. संभाजी मामा सलगरांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 22, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिवच्या राजकारणात भूकंप : आ.राणा जगजितसिंह पाटील यांचे खंदे समर्थकांचा असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश
निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; संभाजी मामा सलगरांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश
धाराशिव (प्रतिनिधी : लोकमदत न्यूज)
धाराशिव नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू असताना भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे कार्यकर्ते व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विश्वासू समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी नगरसेवक संभाजी (मामा) सलगर यांनी भाजपला रामराम ठोकत आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश केला. या प्रवेशामुळे धाराशिवच्या राजकारणात खळबळ उडाली असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सलगर यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आज आयोजित कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार व जिल्हा प्रमुख कैलास घाडगे पाटील तसेच माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर हे प्रमुख उपस्थित होते. सलगर यांचे राजकारणातील अनुभव, त्यांनी केलेले सामाजिक व प्रशासकीय कार्य आणि धाराशिव शहरात असलेला त्यांचा व्यापक प्रभाव लक्षात घेता शिवसेनेची ताकद अधिक वाढणार असल्याचे यावेळी नेत्यांनी स्पष्ट केले.
या पक्षप्रवेशानंतर आमदार कैलास घाडगे पाटील म्हणाले, “सलगर यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला नवी उर्जा आणि बळ मिळाले आहे. त्यांचा अनुभव व कार्याचा लाभ शिवसेनेला निश्चितच निवडणुकीत होईल.” तर राजकीय वर्तुळात हे पाऊल आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात असून कार्यकर्त्यांमध्येही याबाबत चर्चा रंगल्या आहेत.
सलगर हे पूर्वीपासून भाजपचे कट्टर कार्यकर्ते व आमदार राणा पाटील समर्थक म्हणून ओळखले जात होते. शहरात त्यांचा दांडगा जनाधार असून अनेक कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे भाजपच्या गोटात नाराजीची लाट उठण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय आगामी निवडणुकीत धाराशिव शहरातील राजकीय गणित बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
यामुळे धाराशिव शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अधिक बळकट होण्याची चिन्हे स्पष्ट झाली असून धाराशिव शिवसेनेचे बालेकिल्ले होण्यासाठी वेळ लागणार नाही, असा विश्वास नेत्यांनी यावेळी व्यक्त केला. नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली ही हालचाल पुढे अनेक उमेदवारांच्या राजकीय भविष्यावर परिणाम करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी “एवढ्या” आणि “या” उमेदवारांनी अर्ज मागे… पूर्ण यादी सर्वप्रथम “लोकमदत” न्यूज वर

Next Post

धाराशिव निवडणूक 2025 : प्रभाग 17 मध्ये ‘सर्वसामान्य कार्यकर्ता विरुद्ध प्रोफेशनल नेता’ थेट लढत!

Related Posts

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे
राजकारण

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
Next Post

धाराशिव निवडणूक 2025 : प्रभाग 17 मध्ये ‘सर्वसामान्य कार्यकर्ता विरुद्ध प्रोफेशनल नेता’ थेट लढत!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!