• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

जिल्हा परिषद उपाध्यक्ष उषा गायकवाड यांची नळदुर्ग येथील शाळांना सदिच्छा भेट

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
April 23, 2026
in शिक्षण
0
जिल्हा परिषद उपाध्यक्ष उषा गायकवाड यांची नळदुर्ग येथील शाळांना सदिच्छा भेट
0
SHARES
98
VIEWS

जिल्हा परिषद उपाध्यक्ष उषा गायकवाड यांची नळदुर्ग येथील शाळांना सदिच्छा भेट; अतिक्रमणाबाबत कठोर कारवाईचे संकेत,

नळदुर्ग लोकविचार (प्रतिनिधी) अझहर शेख

धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. उषाताई रवींद्र गायकवाड यांनी नळदुर्ग येथील विविध शाळांना सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी शाळांचे एकत्रीकरण, स्वच्छता, विद्यार्थी पटसंख्या आणि शिक्षक-कर्मचाऱ्यांची वर्तवणूक यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा आढावा घेतला. विशेषतः शाळेच्या जागेवर होत असलेल्या वाढत्या अतिक्रमणाची गंभीर दखल घेत, यावर जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत (GB) ठराव मांडून कडक निर्बंध लादण्याचे आश्वासन त्यांनी दिले.उपाध्यक्षांनी शाळांमधील स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी केली व स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड न करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, विद्यार्थी पटसंख्येनुसार सोयीसुविधा उपलब्ध आहेत का, याची माहिती घेत त्यांनी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचीही चौकशी केली. गैरवर्तवणूक करणाऱ्या किंवा कामात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लावणारशाळेच्या मोकळ्या जागेवर होत असलेल्या अतिक्रमणाबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रारी मांडल्या होत्या. यावर बोलताना सौ. गायकवाड म्हणाल्या की, शाळेची जागा ही विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी असून त्यावर होणारे अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही. यासंदर्भात सक्षम पाहणी करून लवकरच अहवाल तयार केला जाईल आणि जिल्हा परिषदेच्या आगामी बैठकीत तसा ठराव मांडून अतिक्रमणधारकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.”यावेळी शिवसेनेचे (उबाठा) उपजिल्हाप्रमुख श्री. ज्ञानेश्वर घोडके, युवासेना शहर प्रमुख विजय ठाकूर, नगरसेवक तथा आरोग्य व स्वच्छता सभापती श्रीमती सुमनकाकी ठाकूर भाजपाचे नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती तानाजी जाधव, शालेय समितीचे अध्यक्ष संतोष पुदाले, आणि उपाध्यक्ष नेताजी महाबोले यांची प्रमुख उपस्थिती होती.या प्रसंगी प्रमोद कुलकर्णी, जमनसिंग ठाकूर, प्रमोद कोकणे, मनोज मिश्रा, बंडू कसेकर, अफजल कुरेशी यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक आणि शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता.या दौऱ्यादरम्यान ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे, भगवान सुरवसे, उत्तम बनसगोळे, दत्तात्रय वाघमारे सर यांनी स्थानिक शैक्षणिक समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि शाळांच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन उपाध्यक्षांनी दिले.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

संयुक्त जयंतीनिमित्त ‘त्यागमूर्ती रमाई’ एकपात्री नाटकाचे आयोजन

Next Post

सर्वसामान्य लोकविचार चा इम्पॅक्ट! धाराशिव जिल्हा झाला ‘कला केंद्रमुक्त’ जिल्हा

Related Posts

शिक्षण प्रेरणा महोत्सवाचे आयोजन
शिक्षण

शिक्षण प्रेरणा महोत्सवाचे आयोजन

September 11, 2026
दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा
शिक्षण

दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा

September 2, 2026
धाराशिव केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेची पाहणी
शिक्षण

धाराशिव केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
शिक्षकांचे टीईटीतून मुक्त करण्यासह विविध मागण्यासाठी शाळा बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा एल्गार !
शिक्षण

शिक्षकांचे टीईटीतून मुक्त करण्यासह विविध मागण्यासाठी शाळा बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा एल्गार !

July 9, 2026
अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…
शिक्षण

अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…

July 8, 2026
जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती
शिक्षण

जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती

July 4, 2026
Next Post

सर्वसामान्य लोकविचार चा इम्पॅक्ट! धाराशिव जिल्हा झाला ‘कला केंद्रमुक्त’ जिल्हा

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!